बॉलिवूडमध्ये जोरात असलेल्या ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत अभिनेता सुशांत सिंग राजपूतवर अभिनेत्री संजना सांघीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. ‘किज्जी और मैनी’च्या सेटवर सुशांत संजनासोबत ‘ओव्हर फ्रेन्डली’ झाला आणि त्याच्या त्या वागण्याला कंटाळून संजना सेटवरून निघून गेली, अशी बातमी मध्यंतरी आली होती. या प्रकारानंतर सुशांतने संजनासोबतचे खासगी चॅट सोशल मीडियावर शेअर करून हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले होते.
#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव! म्हणे, असे काही घडलेच नाही!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 6:45 PM