तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या वादानंतर बॉलिवूडमध्ये ‘मीटू’ मोहिमेला तोंड फुटले. लैंगिक गैरतर्वनाच्या शिकार ठरलेल्या अनेक महिलांनी जगाचा पर्वा न करता आपल्या ‘मीटू’ स्टोरी शेअर केल्यात. अनेक दिग्गजांवर गैरतर्वनाचे आरोप लावलेत. केवळ महिलाचं नाहीत तर काही पुरूषांनीही या मोहिमेअंतर्गत आपल्या ‘मीटू’ स्टोरी जगाला सांगितल्या. यातलेच एक नाव म्हणजे, कंगना राणौतचा एक्स बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमन. अध्ययनने आपली आपबीती सांगताना कंगनाचा अनेक आरोप केले होते. आता अध्ययनच्या बाजूने त्याचे वडिल व अभिनेते शेखर सुमन मैदानात उतरले आहेत. होय, शेखर सुमन यांनी ‘मीटू’ मोहिमेवर भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ‘अध्ययनने आपली ‘मीटू’स्टोरी शेअर केली तेव्हा, तो हे सगळे पब्लिसिटीसाठी करतोय, असे म्हटले गेले. पण आता या सगळ्या महिला स्वत:ची ‘मीटू’ स्टोरी शेअर करत आहेत, मग तेही पब्लिसिटीसाठी आहे का?’,असा सवाल शेखर सुमन यांनी केला.
शेखर सुमन यांचा उपरोधिक सवाल; काय ‘मीटू’ मोहिम संपली? काय क्रांती संपली?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 11:19 AM