‘मीटू’ची आग आता बॉलिवूडमधून टॉलिवूडपर्यंत पोहोचली आहे. होय, साऊथची सुप्रसिद्ध गायिक चिन्मयी श्रीपदा हिनेही ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत आपली कहाणी जगापुढे आणली आहे. तामिळ कवी, गीतकार आणि लेखक वैरामुत्तु यांच्यावर तिने गैरवर्तनाचे आरोप केले आहे.
‘१९ वर्षांची असताना मी माझ्या आईसोबत एका अतिशय दिग्गज व्यक्तिला भेटायला गेले होते. माझी आई माझ्यासोबत होती. पण प्रत्यक्षात मला एकटीलाचं आत बोलवण्यात आले. मला फार आश्चर्य वाटले नाही. मी बेधडकपणे एकटीच खोलीत गेले. पण गेल्या गेल्या त्या व्यक्तिने मला अलिंगण दिले. मी त्याच्या तावडीतून निसटून बाहेर पडायला लागले असता त्याने माझा फोन आणि बॅग पकडून घेतली. या घटनेनंतर अनेक दिवस मी अस्वस्थ होते. ही व्यक्ती दुसरी कुणी नाून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित तामिळ कवी, गीतकार व लेखक वैरामुत्तु आहेत,’असे चिन्मयी श्रीपदाने ट्विटरवर लिहिले आहे.