‘म्हारा देस हरयाणा, जहाँ दूध दही का खाना’ ही हरयाणाची प्रसिद्ध ओळख. आता याच हरयाणाला नवी ओळख मिळू लागली आहे. कारण हरयाणा बॉलिवूडच्या दिग्दर्शकांना आकर्षित करू लागलंय. हरयाणामध्ये चित्रीत अनेक सिनेमांना बॉक्स आॅफिसवर चांगला प्रतिसाद मिळालाय. सलमान, आमिर, रणदीप हुड्डा अशा मोठ्या स्टार्सनीसुद्धा सांस्कृतिक देणं लाभलेल्या हरयाणात शूटिंग केलंय. हरयाणवी भाषा म्हणजे अशिक्षित आणि मागास असा काहींचा समज आहे. मात्र हरयाणाला मिळत असलेली नवी ओळख पाहता हा लोकांचा हा दृष्टिकोनसुद्धा बदलला जाईल. कारण अनेक मोठ्या स्टार्सनीसुद्धा आपापल्या सिनेमात त्याच हरयाणवी लहेजा असलेल्या भाषेचा वापर केला आहे.एनएच 10अनुष्का शर्मा स्टारर या सिनेमात हरयाणातील संकुचित वृत्तीच्या समाजाचं दर्शन घडवण्यात आलं होतं. याशिवाय राज्यातील हॉरर किलिंगसारख्या गंभीर समस्येवर या सिनेमातून भाष्य करण्यात आलं होतं. या सिनेमाचं शूटिंग हरयाणाच्या गुडगाव परिसरात करण्यात आलं होतं.लाल रंग हा सिनेमा रक्तपेढीचा बिझनेस करून फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीवर आधारित आहे. यात याच ठकसेनाची भूमिका साकारली होती अभिनेता रणदीप हुड्डानं. या सिनेमाचं शूटिंग हरयाणाच्या पानिपतमध्ये करण्यात आलं होतं. तनु वेड्स मनु रिटर्न्स तनु वेड्स मनु या सिनेमाचा हा सिक्वेल. लग्नानंतर एका दाम्पत्याच्या जीवनावर आधारित या सिनेमाची कथा होती. यात कंगना राणौतनं मध्यवर्ती भूमिका साकारली होती. हरयाणाच्या झज्जरमधील एका छोट्याशा गावात राहणारी आणि हरयाणवी भाषा बोलणारी व्यक्तिरेखा कंगणानं साकारली होती. कंगणाच्या या भूमिकेचं रसिक, समीक्षकांकडूनही कौतुक झालं. याच भूमिकेसाठी कंगणाला राष्ट्रीय पुरस्कारानंही गौरवण्यात आलंय.दंगल हा आणखी एका कुस्तीपटूच्या जीवनावरील सिनेमा. महावीर सिंग फोगाट यांच्या जीवनावरील या सिनेमात मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमीर खान प्रमुख भूमिका साकारतोय. या सिनेमाचं शूटिंगसुद्धा हरयाणाच्या मातीत करण्यात आलंय. डंगो, गुज्जरवाल या गावात रखरखत्या उन्हात या सिनेमाचं शूटिंग करण्यात आलंय.सुलतान हा सिनेमा हरयाणातले कुस्तीपटू सुलतान अली खान चीमा यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी विविध देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकं मिळवली. आता त्यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे. सलमान खाननं या सिनेमात सुलतान अली खान यांची भूमिका साकारली असून, सिनेमाचं शूटिंग हरयाणात झालंय. या सिनेमातून हरयाणवी संस्कृती आणि हरयाणाच्या मातीतल्या खेळाची झलक रसिकांना अनुभवता येणार आहे.
‘म्हारा हरयाणा’ बी-टाऊन दिग्दर्शकांचं नवं डेस्टिनेशन!
By admin | Published: May 23, 2016 2:49 AM