Join us

DDLJ सिनेमातील 'या' भूमिकेसाठी मिलिंद गुणाजीने दिला होता नकार, काय होतं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 13:15 IST

'ते' एक किरकोळ कारण अन् DDLJ ला दिला नकार

90 च्या दशकातील आयकॉनिक चित्रपट 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सगळ्यांचाच आवडीचा आणि जवळचा असेल. मुंबईतल्या मराठा मंदिरमध्ये आजही या सिनेमाचे शोज लावले जातात. सिनेमातील सर्वच कॅरेक्टर गाजले. तुम्हाला माहितीये का या सुपरहिट सिनेमात मिलिंद गुणाजीला (Mlind Gunaji) महत्वाची भूमिका ऑफर झाली होती. मात्र त्याने एका क्षुल्लक कारणावरुन काम करण्यास नकार दिला.  काय होतं कारण आणि कोणती होती ती भूमिका बघुया.

मिलिंद गुणाजी यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की, 'DDLJ सिनेमात मी काजोलच्या होणाऱ्या नवऱ्याची भूमिका साकारणार होतो. पण मी ही संधी गमावली आणि ही भूमिका परमित सेठीला मिळाली. जेव्हा DDLJ च्या टीमने मला बोलावले तेव्हा त्यांनी एक अट घातली होती. त्यांना दाढी नसलेला क्लीन शेव्ह केलेलाच अभिनेता हवा होता. पण मला ते मान्य नव्हतं कारण मी त्याचवेळी इतर चार सिनेमांचं शूट करत होतो. ज्यासाठी मला दाढी ठेवावीच लागणार होती. म्हणूनच मी DDLJ सारखा सिनेमा करु शकलो नाही याचं मला खूप वाईट वाटतं.'

मिलिंद गुणाजी पुढे म्हणाले,'अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधीही मी गमावली होती. विरासत सिनेमाच्या वेळी सेटवर अपघात झाला आणि शूटच्या तारखा बदलल्या. म्हणून मृत्यूदाता या सिनेमात मी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करु शकलो नाही. तेव्हा एका नवोदित कलाकाराने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला अशी बातमी पसरली. बिग बींना कोणताही गैरसमज होऊ नये म्हणून मी त्यांची भेट घेण्यासाठी मेहबूब स्टुडिओ बाहेर थांबलो होतो. मी त्यांना संपूर्ण परिस्थिती सांगितली यावर ते म्हणाले तू चांगला अभिनेता आहेस. जास्त विचार करु नको आणि रिपोर्ट्सची पर्वा मी करत नाही.'

मिलिंद शेवटचे 'भूलभूलैय्या २'मध्ये दिसले होते. तसंच अजय देवगणच्या 'रुद्र' या ओटीटी सिरीजमध्येही त्यांची भूमिका होती. 

टॅग्स :मिलिंद गुणाजीमराठी अभिनेताबॉलिवूडसिनेमा