Join us

कायम एकच टी-शर्ट आणि एकच चप्पल? ट्रोल झाला मिलिंद सोमण, अंकिताने असे दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 5:04 PM

सोशल मीडियावर फिटनेस फोटो व व्हिडीओमुळे चर्चेत राहणारा अभिनेता मिलिंद सोमण सध्या ट्रोल होतोय. या ट्रोलिंगचे कारण ऐकले तर तुम्हीही हैराण व्हाल.

ठळक मुद्देमिलिंद सोमण एक सुपर मॉडल राहिलाय आणि अनेक सिनेमातही त्याने काम केलंय.

सोशल मीडियावर फिटनेस फोटो व व्हिडीओमुळे चर्चेत राहणारा अभिनेता मिलिंद सोमण सध्या ट्रोल होतोय. या ट्रोलिंगचे कारण ऐकले तर तुम्हीही हैराण व्हाल. होय, एकच एक टी-शर्ट आणि एक एक चप्पल घातल्यामुळे मिलिंद ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. लोकांनी मिलिंदला नाही नाही ते ऐकवले. मिलिंदने तर ट्रोलर्सच्या या कमेंट्सकडे दुर्लक्ष केले. पण त्याची पत्नी अंकिता हिने मात्र कपडे आणि चपलांवरून पतीला ट्रोल करणा-यांना सणसणीत उत्तर दिले.मिलिंदसोबतचा एक फोटो शेअर करत तिने ट्रोलर्सला असे काही सुनावले की, त्यांची बोलती बंद झाली.

‘ त्याच्याजवळ एकच टी-शर्ट आहे का? असा प्रश्न मी अनेकदा ऐकते. OMG, मी नेहमी तुम्हाला एकच टी-शर्ट आणि एकच चपला घालताना पाहते, असे काय काय ऐकते. हम्म... कमीत कमी गरजांत जगणे कसे वाटते? मी म्हणेल की, हा एक मस्त अनुभव आहे.  तो (मिलिंद)कसाही असो, मी माझ्या पतीवर प्रेम करते, त्याचा आदर करते. आजच्या जगात जिथे अक्षरश: लवकर खा, लवकर मिळवा असा आग्रह असताना लोकांना वापर आणि अपव्यय यातला फरक समजणे कठीण आहे. मात्र माझ्या मते, आपल्या गरजा मर्यादीत ठेवण्याइतके अधिक जबाबदारीचे काम अन्य कुठलेही नाही, ’ असे अंकिताने लिहिले.

पुढे तिने लिहिले, पराकोटीची स्पर्धा, मागणीच्या याकाळात स्वत:द्वारे निवडलेल्या गोष्टींना समजण्यासाठी लोकांकडे वेळ नाही. फास्ट फूड, फास्ट फॅशन, फास्ट विचार... आपण एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा त्याच्याशी संबंधित विचारही खरेदी करत असतो. मात्र याचा आपण कधीच विचार करत नाही. कमीत कमी गरजांचा अर्थ हा नाही की तुम्ही सगळे काही सोडून द्या आणि एखाद्या गुहेत राहायला जा. याचा अर्थ अधिक जबाबदार होणे हा आहे. याचा अर्थ काही खरेदी करण्यापूर्वी त्याची किती गरज आहे आणि त्याचा वापर आपण किती करणार आहोत, हा आहे. काही आकर्षक वस्तू पाहताना त्या खरेदी करण्याचा मोह मलाही होतो. पण मी गरज असेल तरच ती वस्तू खरेदी करते. एखाद्यस गोष्टीची किती गरज आहे, किमान हा विचार एखादी वस्तू खरेदी करताना आपण करायलाच हवा.

मिलिंद सोमण एक सुपर मॉडल राहिलाय आणि अनेक सिनेमातही त्याने काम केलंय. मिलिंद त्याच्या एका न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच फेमस झाला होता. तो फिटनेसमुळे चर्चेत असतो. तसेच ५४ वर्षीय मिलिंदने २८ वर्षीय अंकित कुंवरसोबत लग्न केल्यावरही तो चर्चेत आला होता.

OMG! मिलिंद सोमनने काय केले पाहा...; चक्क कियारा अडवाणी ‘त्या’ टॉपलेस फोटोची केली कॉपी!!

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले मिलिंद सोमण आणि अंकिता कंवर, पाहा त्यांचे रोमँटीक फोटो

टॅग्स :मिलिंद सोमण