Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: मिलिंद सोमणसोबतचा ‘सेल्फी’ आता सोपा नाही! जिथे असाल तिथे करावे लागेल हे काम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 12:38 IST

फिटनेस फ्रिक मिलिंद तरूणाईच्या गळ्यातील ताईत आहे. त्याच्यासोबत सेल्फी कोणाला नको असेल? पण आता सेल्फी हवा तर मिलिंदची एक अट मान्य करावी लागणार आहे

ठळक मुद्देबॉलिवूडचा फिटनेस फ्रिक मिलिंद सोमणने आपल्या करिअरमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. आज मिलिंद अनेकांचा रोल मॉडेल आहे.

आपल्या आवडत्या स्टारसोबत सेल्फी घेण्यासाठी फॅन्स काहीही करायला तयार होतील. अगदी भर रस्त्यावर पुशअप्स मारा, म्हटले तरी एका पायावर करतील. विश्वास बसत नाहीये? मग तुम्ही अभिनेता मिलिंद सोमणच्या फॅन्सचे  व्हिडीओ व फोटो बघायलाच हवेत. होय, फिटनेस फ्रिक मिलिंद तरूणाईच्या गळ्यातील ताईत आहे. त्याच्यासोबत सेल्फी कोणाला नको असेल? पण आता सेल्फी हवा तर मिलिंदची एक अट मान्य करावी लागणार आहे आणि विशेष म्हणजे, अनेक तरूण-तरूणी त्याची ही अट मानायला तयारही आहेत. ही अट काय तर मिलिंदसोबत सेल्फी हवा असेल तर पुशअप्स मारावे लागतील. मुलांनी 20 तर मुलींनी 10. आहे ना मजेदार!

अलीकडे एक चाहती मिलिंदला भेटली. तिने मिलिंदला एका सेल्फीसाठी विनंती केली. पण मिलिंदसोबत सेल्फी सोपा नव्हताच. सेल्फी हवा तर 10 पुशअप्स मार, असे मिलिंदने तरूणीला म्हटले आणि ती तरूणी अगदी हसत हसत यासाठी तयार झाली. मग काय भररस्त्यावर तिने 10 पुशअप्स मारले. तेव्हा कुठे तिला मिलिंदसोबत सेल्फी मिळाला.

मिलिंदने  एका चाहत्याचा पुशअप काढतानाचा फोटो शेअर केला आहे. सोबत एक पोस्ट. ‘सेल्फी काढायचा असेल तर पुशअप्स मारावे लागतील. 20 मुलांसाठी आणि 10 मुलीसांठी. कारण माझी आई वयाच्या 82 व्या वर्षी 20 पुशअप्स मारते.  जवळजवळ 90% लोक पुशअप्स मारायला तयार झालेत, याचा आनंद आहे. काहींनी ते पहिल्यांदा केले तर काहींनी विमानतळ, हॉटेल, महामार्गावर देखील केले. जी गोष्टी तुमच्या चांगल्यासाठी असते ती करायला कधी नाही म्हणू नका. खासकरुन कोण काय म्हणेल, असा विचार करून ती गोष्ट टाळू नका,’ असे त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे.  

टॅग्स :मिलिंद सोमण