Join us

२६ वर्षांनी लहान असलेली अंकिता मिलिंदला म्हणते पापाजी; 'हे' आहे त्यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 18:23 IST

Milind soman: मिलिंद आणि अंकिताने २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली. तेव्हापासून ही जोडी सातत्याने चर्चेत येत आहे.

लोकप्रिय मॉडेल- अभिनेता मिलिंद सोमण (milind soman) आणि त्याची पत्नी अंकिता कंवर ही जोडी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. अंकिता आणि मिलिंद यांच्या वयात जवळपास २६ वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे वयातील या अंतरामुळे अनेकदा या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र, ही जोडी अशा ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करताना दिसते. मिलिंद आणि अंकिता सोशल मीडियावर कायम एकमेकांप्रतीचं प्रेम व्यक्त करत असतात. परंतु, यावेळी मिलिंदने त्यांच्या नात्यामधलं एक गुपित सांगितलं आहे.

अंकिता, मिलिंदला चक्क पापाजी या नावाने हाक मारते. एका चाहत्याच्या कमेंटला उत्तर देत मिलिंदने या गोष्टींचा खुलासा केला होता. काही काळापूर्वी मिलिंद आणि अंकिता यांचा 'फ्री टू लव्ह कॅम्पेन'चा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये मिलिंद चाहत्यांनी केलेल्या काही कमेंट वाचत होता. सोबतच त्या कमेंटला उत्तरंही देत होता. हे प्रश्न वाचत असताना 'खरं तर अंकिताने तुम्हाला पापाजी म्हटलं पाहिजे', अशी कमेंट एका युजरने केली होती.

युजरच्या या प्रश्नाला मिलिंदनेही उत्तर दिलं. 'हो. काही वेळा खरंच अंकिता मला पापाजीच म्हणते', असं उत्तर मिलिंदने दिलं. त्यानंतर त्याने अंकिता आणि त्याच्या वयातील अंतरावरही भाष्य केलं. दरम्यान, मिलिंदने २०१८ मध्ये अंकिता कंवरसोबत लग्नगाठ बांधली आहे.

टॅग्स :मिलिंद सोमण सेलिब्रिटीसिनेमाअंकिता कुंवर