Join us

रंगपंचमीच्या दिवशी मिलिंद सोमण पत्नीसोबत झाला रोमॅण्टिक; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 13:07 IST

Milind soman: सध्या सोशल मीडियावर मिलिंद आणि अंकिताचं होळी स्पेशल फोटोशूट चांगलंच चर्चेत येत आहे.

आपल्या फिटनेसपुढे तरुण मुलांनाही पिछाडीवर टाकणारा मॉडेल, अभिनेता म्हणजे मिलिंद सोमण (milind soman). वयाची ५० पार केल्यानंतरही मिलिंदचा फिटनेस तरुणांना लाजेवल असाच आहे. फिटनेससोबतच मिलिंद अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येतो. मिलिंदने त्याच्यापेक्षा २६ वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कोंवरसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे ही जोडी सातत्याने चर्चेत येत असते. यामध्येच रंगपंचमीच्या दिवशी ही जोडी रोमॅण्टिक झाल्याचं दिसून आलं. मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्रामवर अंकितासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर सक्रीय असलेला मिलिंद अनेकदा अंकितासोबतच्या वर्कआऊट, फिटनेस ट्रेनिंग वा डे आऊटचे फोटो शेअर करत असतो. मात्र, यावेळी त्याने रोमॅण्टिक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अंकिता आणि मिलिंद एकमेकांना फिल्मी स्टाइलमध्ये रंग लावताना दिसत आहेत.

 दरम्यान, सध्या सोशल मीडियावर मिलिंद आणि अंकिताचं होळी स्पेशल फोटोशूट चांगलंच चर्चेत येत आहे. यापूर्वीही मिलिंदने अनेकदा अंकितासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. मिलिंद आणि अंकिता अनेकदा त्यांच्या वयातील अंतरामुळे ट्रोल झाले आहेत. लग्नाच्यावेळी मिलिंदचं वय ५२ होतं. तर, अंकिता केवळ २ वर्षांची होती.  

टॅग्स :मिलिंद सोमण अंकिता कुंवरबॉलिवूडसेलिब्रिटीहोळी 2023