Join us

मिलिंद सोमणची पत्नी अंकिता कोंवरची पोस्ट व्हायरल; “सर्व काही ठीक नाही, मी खूप रडते, जेव्हा...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 09:54 IST

सुपर मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणची पत्नी अंकिता कोंवर सध्या मानसिक तणावाशी लढत आहे. सोशल मीडिया पोस्टमधून तिने याबाबत खुलासा केला आहे.

मुंबई – अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कोंवर नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर हे दोघंही प्रचंड सक्रीय आहेत. रॉमेन्टिक फोटो अपलोड करत अनेकदा आपल्या चाहत्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न करतात. मिलिंद सोमण यांच्यापेक्षा खूप कमी वयाची अंकिता असल्याने ती कायम चर्चेत राहिली आहे. मात्र सध्या अंकिताने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टनं सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.

सुपर मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणची पत्नी अंकिता कोंवर सध्या मानसिक तणावाशी लढत आहे. सोशल मीडिया पोस्टमधून तिने याबाबत खुलासा केला आहे. एक फोटो पोस्ट करत अंकिताने भलेही हा फोटो हसरा असला तरी त्यामागील सत्य काही ठीक नाही असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अंकिताने ड्रिंक घेतानाचा फोटो पोस्ट करत म्हटलंय की, अलीकडच्या एका फोटोनं माझ्या मनात विचारांचे काहूर निर्माण केले परंतु माझ्या चेहऱ्यावर स्माईलसह शांती होती. हा माझ्याकडे अजूनही काही दिवस आहेत जिथे सर्वकाही ठीक नाही. प्रत्येक गोष्ट जी ठीक वाटते मात्र वास्तविक ती ठीक नसते असं तिने म्हटलं आहे.

अंकिताने पोस्टमध्ये लिहिलंय की, काही गोष्टी ठराविक काळानंतर अर्थहिन वाटतात. परंतु मी आता पूर्वीसारखं घाबरत नाही. चिंता आणि मानसिक तणाव यात बराच काळ जीवन जगल्यानंतर मला आजही अनेकदा काळ्या सावटाचा सामना करावा लागतो. मी रडते जेव्हा मला अंधाराचा सामना करावा लागतो. मी माझ्याच विचारात राहत नाही जसं मी राहत होती. परंतु आता मी मजबूत झाली आहे. अधिक सकारात्मक झाली आहे. मी अंधारातही प्रकाशाकडे पाहण्याची दृष्टी ठेवते. आमच्यातल्या काही जणांना या जगात जगण्यासाठी इतरांच्या तुलनेत जास्त मेहनत घ्यावी लागते. हे सर्वांसाठी सोप्पं नाही. तुम्ही फक्त अधिक मजबूत होत जाता असं त्यात म्हटलंय.

अंकिता आणि मिलिंद सोमण यांच्या लग्नाला ३ वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. गेल्या ७ वर्षापासून दोघंही रिलेशनमध्ये आहेत. नात्यांच्या अनेक वर्षानंतरही दोघांमध्ये प्रेमाची चांगली केमिस्ट्री पाहायला मिळते. दोघं अनेकदा एकमेकांसोबत रोमॅन्टिक पोस्ट शेअर करताना आढळतात. परंतु या दोघांमधील वयाच्या अंतरामुळे सोशल मीडियावर नेटिझन्सकडून त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.  

टॅग्स :मिलिंद सोमण अंकिता कुंवर