हेच एखाद्या मुलीनं केलं असतं तर? रणवीरचं न्यूड फोटोशूट पाहून भडकली अभिनेत्री मिमी चक्रवर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 03:37 PM2022-07-22T15:37:40+5:302022-07-22T15:38:10+5:30
Ranveer Singh Nude Photoshoot , Mimi Chakraborty : रणवीर सिंगने चक्क न्यूड फोटोशूट केलं. त्याने केलेल्या या न्यूड फोटोशूटची सध्या जोरदार चर्चा आहे. मिमी चक्रवर्तीने ट्विट शेअर करत, यानिमित्ताने वेगळाच प्रश्न उपस्थित केला आहे...
Ranveer Singh Nude Photoshoot : अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) त्याच्या अतरंगी फॅशनमुळे तसाही चर्चेत असतो. पण आत्ता त्याने हद्दच केली. त्याने चक्क न्यूड फोटोशूट केलं. ‘पेपर’ या मासिकासाठी त्याने केलेल्या या न्यूड फोटोशूटची सध्या जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर तर खळबळ माजली आहे. रणवीरचे चाहतेच नाही तर इंडस्ट्रीतले लोकही शॉक्ड झालेत. अशात बंगाली अभिनेत्री व तृणमूलच्या खासदार मिमी चक्रवर्ती (Mimi Chakraborty ) रणवीरचे हे फोटो पाहून चांगलीच भडकली.
We talk about Equality where is that now??!!!!You know right its your perspective that can change something or destroy it https://t.co/xFCpF3qMcr this case lets broaden our perspective coz that body comes with a lot of sacrifice trust me🙏(No salt, No sugar, No carbs…) 1/2
— Mimi chakraborty (@mimichakraborty) July 21, 2022
मिमी चक्रवर्तीने ट्विट शेअर करत, यानिमित्ताने वेगळाच प्रश्न उपस्थित केला. ‘रणवीरच्या नव्या फोटोशूटनंतर इंटरनेटवर खळबळ माजली आहे. सर्वजण कमेंटमध्ये फायर इमोजी शेअर करत आहेत. मी विचार करतेय की, हेच फोटोशूट एखाद्या मुलीने केलं असतं तर? तेव्हाही तिचं असंच कौतुक झालं असतं? तुम्ही आत्तापर्यंत तिचं घरदार जाळलं असतं. तिच्याविरोधात मोर्चा उघडला असता. तिला जीवे मारण्याची धमकी दिली असती. तिच्या इभ्रतीची लक्तरं वेशीवर टांगली असती. आपण समानतेच्या गोष्टी करतो. आता ती कुठे आहे? तुम्हाला सगळ्यांनाच ठाऊक आहे की, तुमचा दृष्टिकोण सगळं काही बदलवू शकतो नाही तर पूर्णपणे नष्ट करू शकतो. याच्याबाबतीत थोडा दृष्टिकोण व्यापक करू या. कारण त्याने ते फोटोशूट खूप निष्ठेनं केलं आहे,’ असं तिने म्हटलं आहे.
मिमीच्या या विचारांचं काही लोकांनी समर्थन केलं आहे तर काहींनी वेगवेगळे तर्क मांडले आहेत.
.@RanveerOfficial: the Last Bollywood Superstar https://t.co/mMuFPyFP44pic.twitter.com/eQkD3baj17
— Paper Magazine (@papermagazine) July 21, 2022
रणवीर म्हणतो,
खुद्द रणवीरचं या न्यूड फोटोशूटबद्दल काय म्हणणं आहे तर त्याला नेहमीप्रमाणे लोक काय म्हणतील याची पर्वा मुळीच नाही. यात काहीही वाईट नाही. कारण या फोटोत तुम्ही फक्त माझा आत्मा पाहू शकता, असं त्याने म्हटलं आहे. आपल्या या बोल्ड फोटोशूटचं रणवीरने समर्थन केलं आहे. ‘नेकेड फोटोशूट करणं माझ्यासाठी फार कठीण नाहीये. या फोटोंमधून तुम्ही फक्त माझी आत्मा बघू शकता. मी हजारो लोकांसमोर नेकेड होऊ शकतो. माझ्यामुळे ते अस्वस्थ होतील. मात्र मला काहीच अडचण नाहीय,’असं तो म्हणाला.यावरून अभिनेत्याला आपल्या या फोटोशूटबाबत प्रचंड आत्मविश्वास असल्याचं दिसून येत आहे.