अशोक सराफांसोबत काम करण्याचा मलाही योग आला; मंत्री छगन भुजबळांनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 08:05 PM2024-01-30T20:05:26+5:302024-01-30T20:10:08+5:30

ते आजही कला क्षेत्रात सक्रिय आहेत आणि मराठी चित्रपट, नाटकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत असं मंत्री छगन भुजबळांनी सांगितले.

Minister chhagan Bhujbal who worked in the film with Ashok Saraf congratulated his friend for Maharashtra Bhushan Award | अशोक सराफांसोबत काम करण्याचा मलाही योग आला; मंत्री छगन भुजबळांनी सांगितला किस्सा

अशोक सराफांसोबत काम करण्याचा मलाही योग आला; मंत्री छगन भुजबळांनी सांगितला किस्सा

मुंबई - Chhagan Bhujbal on Ashok Saraf ( Marathi News ) कला क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने शासनाने गौरव केला आहे. अशोक सराफ यांना जाहीर झालेल्या पुरस्कारानंतर विविध क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. सरकारमधील मंत्री आणि अशोक सराफांसोबत काम केलेल्या सहकलाकाराने त्यांचे कौतुक केले आहे. मराठी अभिनय सृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि माझे मित्र अशोक सराफ यांना राज्य सरकारकडून २०२३ चा महाराष्ट्र भूषण हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन असं मंत्री छगन भुजबळांनी म्हटलं आहे. 

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मराठी हिंदी-चित्रपट आणि नाटकांमधून अशोक सराफांनी आजवर अनेक विविधरंगी भूमिका साकारत आपल्या अप्रतिम अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. विनोदाच्या 'टायमिंग'साठी ते खूप प्रसिद्ध आहेत. चाहत्यांमध्ये 'अशोक मामा' म्हणून लोकप्रिय असलेले अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचा मलाही योग आला असं त्यांनी म्हटलं. 

सुरुवातीपासूनच अभिनयाचे आकर्षण असल्याने मी सामाजिक कामाबरोबरच संधी मिळेल तेव्हा आपली अभिनयाची हौस भागविण्याचा प्रयत्न केला. दैवत, नवरा-बायको या चित्रपटांमधून मी छोट्या भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे दोन्ही चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. या निमित्ताने या दिग्गज अभिनेत्याचे काम जवळून पाहता आले असा अनुभव मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितला. त्याचसोबत ते आजही कला क्षेत्रात सक्रिय आहेत आणि मराठी चित्रपट, नाटकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. हा पुरस्कार म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्या अष्टपैलू अभिनयाचा आणि कामाचा उचित सन्मान आहे. यापुढेही त्यांनी याप्रमाणेच कलेची सेवा करत रहावी आणि त्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य लाभावे अशा शुभेच्छा भुजबळांनी दिल्या आहेत. 

अभिनयातील 'वजीरा'चा महासन्मान

ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट् रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले" अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Minister chhagan Bhujbal who worked in the film with Ashok Saraf congratulated his friend for Maharashtra Bhushan Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.