अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह दिसते. खासगी आयुष्यातले अनेक फोटो आणि व्हिडीओ ती सर्रास शेअर करते. सध्या मीरा एका पोस्टमुळे चर्चेत आहे. या पोस्टमध्ये मीराने एका ई-कॉमर्स वेबसाईटची चांगलीच शाळा घेतली आहे.त्याचे झाले असे की, मीराने अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून काही साहित्य ऑर्डर केले होते. हे पार्सल आले आणि ते उघडताच मीराचा संताप अनावर झाला. अॅमेझॉनने प्लास्टिक एअरबॅगनी भरलेल्या खोक्यात हे पार्सल पाठवले होते. यानंतर मीराने या पॅकिंगचे फोटो शेअर करत,अॅमेझॉनचा चांगलाच क्लास घेतला.
‘एका साध्या वस्तूसाठी इतक्या प्लास्टिक एअरबॅग्सनी भरलेले ओवरसाईज पॅकेज पाठवणे मुर्खपणा आहे. ही सामग्री याशिवायही डिलीवर केली जाऊ शकली असती. आपली छोटीशी चूकही पृथ्वीला धोकादायक ठरू शकते.
एकीकडे अॅमेझॉनने ओव्हरसाईज पॅकेजिंगचे नियम बनवले आहे आणि यासाठी दंडाची तरतूद करते. मात्र दुसरीकडे विकणाºयांवर याचा जराही परीणाम होत नाही. सेलर्सकडे लक्ष देणे ही अॅमेझॉनची जबाबदारी आहे’, असेही तिने सुनावले.