Join us

लखनौमध्ये 'मिर्झापूर २' विरोधात कोर्टात अर्ज दाखल, सीरीजवर लावण्यात आले गंभीर आरोप...

By अमित इंगोले | Published: November 06, 2020 1:30 PM

मिर्झापूरमधून भोजपुरी भाषा क्षेत्राला गुन्हेगारी दाखवण्याची तक्रार करण्यात आली आहे. कृष्णा सेनेचे अध्यक्षांनी कोर्टात अर्ज केला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेली वेबसीरीज 'मिर्झापूर' वरून नवा वाद सुरू झाला आहे. लखनौमध्ये वेबसीरीज 'मिर्झापूर-2' विरोधात कोर्टात अर्ज दाखल केला आहे. ज्यात यूपी, बिहारच्या लोकांची चुकीची प्रतिमा दाखवण्याची तक्रार करण्यात आली आहे.

सोबतच भोजपुरी भाषा क्षेत्राला गुन्हेगारी दाखवण्याची तक्रार करण्यात आली आहे. कृष्णा सेनेचे अध्यक्षांनी कोर्टात अर्ज केला आहे. सीरीजसंबंधी फरहान अख्तर, रितेश सिधवानी, पंकज त्रिपाठीवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. या अर्जावर सीजेएमने हजरतगंज पोलिसांना एफआयआरबाबत सांगितलं आहे. (मुन्ना अमर है! दिव्येंदु शर्माने सांगितलं, 'मिर्झापूर 3' मध्ये परत येऊ शकतो मुन्ना त्रिपाठी; कसा ते वाचा....)

असं असलं तरी वेबसीरीजचा लखनौच्या हजरतगंजचा काही संबंध नाही. पण कोर्टाच्या आदेशाचं पालन करत सीजीएमने रिपोर्ट मागितला आहे जो त्यांना द्यायचा आहे. मिर्झापूर सीरीजवरून मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल यांनीही ट्विट करून वेबसीरीज विरोधाक कारवाई करण्याची मागणी केली होती. अनुप्रिया पटेल यांनी काही दिवसांपूर्वी आरोप लावला होता की, या वेबसीरीजच्या माध्यमातून मिर्झापूरची प्रतिमा डागाळली जात आहे. ज्यावर पंकज त्रिपाठी यांनीही प्रतिक्रिया दिली होती.

पंकज त्रिपाठी म्हणाले होते की, प्रत्येक एपिसोडच्या सुरूवातीला एक डिस्क्लेमर येतं. ज्यातत लिहिलं असतं की, मिर्झापूर एक काल्पनिक कथा आहे आणि याचा कोणत्याही व्यक्तीचा किंवा ठिकाणाचा संबंध नाही. मी एक कलाकार आहे आणि यापेक्षा जास्त मला यावर काही बोलायचं नाहीये. मला हेही सांगायचं आहे की, मिर्झापूर सीरीजजमध्ये जर क्रिमिनल्स आहेत तर यात रमाकांत पंडीत नावाचा हिरोही आहे ज्याला शहरासाठी चांगलं काम करायचं आहे. 

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजवेबसीरिज