Mirzapur 2 : मुन्ना भैयाच्या रॅप सॉंगवर थिरकणार फॅन्स, व्हिडीओ झाला व्हायरल
By अमित इंगोले | Published: October 22, 2020 02:32 PM2020-10-22T14:32:16+5:302020-10-22T14:41:58+5:30
मिर्झापूर २ च्या मेकर्सनी नुकताच मुन्ना भैयावर तयार केलेलं एक रॅप सॉंग शेअर केलंय. हे रॅप सॉंग ऐकून प्रेक्षक थिरकणार हे नक्की आहे.
अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या आगामी 'मिर्झापूर 2' वेबसीरीजचं प्रमोशन जोरदार सुरू आहे. ही वेबसीरीज बघण्यासाठी प्रेक्षत आतुर झालेले आहेत. मेकर्सना ही बाब चांगली माहीत असल्याचे ते सतत प्रमोशनल व्हिडीओ फॅन्ससोबत शेअर करत आहेत. मिर्झापूर २ च्या मेकर्सनी नुकताच मुन्ना भैयावर तयार केलेलं एक रॅप सॉंग शेअर केलंय. हे रॅप सॉंग ऐकून प्रेक्षक थिरकणार हे नक्की आहे.
बॉयकॉटची झाली होती मागणी
3 ऑक्टोबरपासून 'मिर्झापूर' वेबसीरीजचा दुसरा सीझन बघायला मिळणार आहे. ६ ऑक्टोबरला याचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. ट्रेलर प्रेक्षकांना चांगलाच आवडला आणि ते आता वेबसीरीजची आतुरतेने वाट बघत आहेत. पण काही लोकांनी सीरीजला गुड्डू पंडीत(अली फजल)च्या जुन्या ट्विटमुळे बॉयकॉट केलंय आणि ट्विटरवर बॉयकॉट मिर्झापूर ट्रेन्डही होऊ लागलं. ('बाहेर बोलले तर फटके पडतील', मिर्झापूर - 2 बॉयकॉट करणाऱ्यांना 'मुन्ना भैया'चा दणका...)
काय म्हणाला होता 'मुन्ना भैया'
या सर्व प्रकरणावर आपलं मत मांडत अली फजल म्हणाला होता की, समाजातील एका छोट्याशा वर्गाच्या विरोधाला समोर ठेवून ते मागे हटणार नाहीत. आता या प्रकरणावर सीरीजमधील मुन्ना भैया(दिव्येंदु शर्मा)ने आपलं मत मांडलं आहे. दिव्येंदु शर्मा म्हणाला की, त्याला या बॉयकॉटने फरक पडत नाही. अशा लोकांना माहीत नाही की, ते किती अडचणीत आहेत.
आयएनएससोबत बोलताना दिव्येंदु म्हणाला की, 'मला या गोष्टींमुळे जास्त त्रास होत नाही. बॉयकॉट करणाऱ्या लोकांना हे माहीत नाही की, ते किती अडचणीत आहेत. कारण मिर्झापूरचे फॅन्स जास्त आहेत. त्यांनी हा मूर्खपणा बंद करावा. अशाप्रकारचा हॅशटॅग वापरणं मूर्खपणा आहे. सर्वांनाच माहीत आहे की, लोक मिर्झापूरवर किती प्रेम करतात. हे सगळे पेड ट्रेन्ड आहेत. मला त्यांची दया येते'. (बॉयकॉट मिर्झापूर म्हणणाऱ्यांना अली फजलचं सडेतोड उत्तर, म्हणाला....)
दिव्येंदु पुढे म्हणाला की, 'बाहेर निघून काही लोकांनी बायकॉटचा विषय काढू नये. खूप मार पडेल त्यांना'. सोबतच तो म्हणाला की, मिर्झापूर सीरीजसोबत जुळणं फार शानदार अनुभव होता. मी तो शब्दात सांगू शकत नाही. जेव्हाही मी कुठे जातो, खासकरून उत्तरप्रदेशातील लोक माझ्याजवळ येतात आणि मला मुन्ना भैया म्हणून हाक मारतात. इतकं प्रेम आणि लोकप्रियता मिळणं आनंदाची बाब आहे'.
मिर्झापूर सीरीजमध्ये दिव्येंदु शर्माने मुन्ना भैया नावाची भूमिका साकारली आहे. मुन्ना भैया अखंडानंद त्रिपाठी उर्फ कालीन भैयाचा बिघडलेला मुलगा आहे. सीरीजमधील त्याची ही भूमिका प्रेक्षकांना फारच पसंत पडली आहे. इतर भूमिकांप्रमाणेच ही भूमिकाही लोकांनी डोक्यावर घेतली आहे.