अपयशानंतर चुकीची जाणीव

By Admin | Published: August 7, 2014 12:50 AM2014-08-07T00:50:56+5:302014-08-07T00:50:56+5:30

एखादा चित्रपट आपटला तर त्या चित्रपटात भूमिका केल्याबद्दल पश्चात्ताप होतोय, अशी रोखठोक भूमिका कलाकार आता घेऊ लागले आहेत.

Misconception after failing | अपयशानंतर चुकीची जाणीव

अपयशानंतर चुकीची जाणीव

googlenewsNext
>अनुज अलंकार - मुंबई
एखादा चित्रपट आपटला तर त्या चित्रपटात भूमिका केल्याबद्दल पश्चात्ताप होतोय, अशी रोखठोक भूमिका कलाकार आता घेऊ लागले आहेत. काही कलाकार केवळ मैत्रीसाठी एखाद्याच्या चित्रपटात काम करतात. मात्र त्यातल्या चित्रपटांना अतिशय वाईट प्रतिसाद मिळाल्यावरच त्याची जाणीव त्यांना होते.
असेच काहीसे सैफ अली खानच्या बाबतीत झाले आहे. साजिद खानचा ‘हमशकल्स’ चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. त्यात सैफ अली खान, रितेश देशमुख, राम कपूर यांनी भूमिका केल्या होत्या. अत्यंत वाईट कथानक आणि कलाकारांच्या वाईट अभिनयामुळे मात्र चित्रपटाला सपाटून मार खावा लागला. चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान बिपाशा बासू तर लांबच होती. तर सैफने चित्रपटाची भरपूर प्रसिद्धी केली होती. मात्र आता सैफला चित्रपटाची अवस्था बघून आपण यात काम करून चूक केल्याची भावना निर्माण झाली आहे. नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान त्याने हे वक्तव्य केले असून आता साजिद खानबरोबर कोणत्याही चित्रपटात काम करणार नसल्याचेही संकेत दिले आहेत. 
अशी जाणीव सैफला याआधीही झाली होती. आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याने सुधाकर बोकाडेंच्या ‘सनम तेरी कसम’ चित्रपटात पूजा भट्टबरोबर काम केले होते. काही कारणांमुळे हा चित्रपट उशिरा प्रदर्शित होणार होता. त्यामुळे चित्रपटाविषयी सैफचा रस कमी झाला. हा चित्रपट दूरदर्शनवर दाखवला गेला. त्यानंतर या चित्रपटासंदर्भात विचारणा झाल्यावर त्याने हा चित्रपट करणो आपली चूक असल्याचे मान्य केले होते. 
अशाप्रकारे नंतर आपल्या चुकांची जाणीव होणारे सैफप्रमाणो इंडस्ट्रीत अनेक कलाकार आहेत. या यादीत सलमान, अजय देवगण आणि संजय दत्त यांचे नावही घ्यावे लागेल. आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात सलमानने मझधार’ चित्रपटात काम केले होते. त्यात राहुल रॉय, मनीषा कोईराला यांनीही भूमिका केल्या होत्या. चित्रपट तयार होण्यास बराच कालावधी लागला. त्यादरम्यान चित्रपटाविषयी सलमानचा रस संपला. त्याने चित्रपट प्रदर्शन होऊ नये यासाठी प्रयत्नही केले. पण ते अपयशी ठरले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला चुकीची जाणीव झाली होती. 
अनुभव सिन्हाच्या कॅश’ चित्रपटात काम करण्यासाठी अजय देवगण खूप उत्सुक होता. पण शूटिंगदरम्यान या दोघांच्यात मोठय़ा प्रमाणावर खटके उडले. त्याचा परिणाम साहजिकच चित्रपटावर होणार होता. त्यामुळेच चित्रपट प्रदर्शित होण्याआधी आपल्या चाहत्यांना हा चित्रपट पाहू नये, अशी विनंती त्याने केली. हा चित्रपट  उगीचच स्वीकारल्याची जाणीवही त्याला झाली. संजय दत्तबाबतीत असेच काहीसे घडले. संजय गुप्ताच्या दिग्दर्शनात जंग’ चित्रपटाची निर्मिती होत असताना संजयचा निर्मात्याबरोबर मोठा वाद झाला. त्यामुळे त्यानेही आपल्या चाहत्यांना हा चित्रपट पाहू नये, अशी विनंती केली होती. 
ज्येष्ठ विश्लेषक विनोद मिरानी म्हणतात की, व्यावसायिक चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील गणितावरच सगळे अवलंबून असते. जर हमशकल्सला मोठे यश मिळाले असते तर त्याने चित्रपटाचा भाग होतो म्हणून स्तु्तिसुमने उधळली असती. पण चित्रपट न चालल्याने त्याने हे वक्तव्य केले. यशाचे अनेक दावेदार असतात. पण अपयश एकटय़ालाच भोगावे लागते. त्यातलीच ही गत असल्याचेही मिरानी म्हणाले. 
 

Web Title: Misconception after failing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.