Miss Universe 2018 : भारताच्या नेहलने केली निराशा! फिलिपीन्सच्या काट्रियोनाने पटकावला ‘मिस युनिव्हर्स’ ताज!!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 12:20 PM2018-12-17T12:20:55+5:302018-12-17T12:22:21+5:30
बँकॉक येथे रंगलेल्या ६७ व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत फिलिपीन्सची काट्रियोना ग्रे हिने यंदाचा ‘मिस युनिव्हर्स’चा ताज पटकावला. या स्पर्धेत सहभागी झालेली भारताची नेहल चुडासमा हिला टॉप -20 मध्येही आपले स्थान राखता आले नाही.
बँकॉक येथे रंगलेल्या ६७ व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत फिलिपीन्सची काट्रियोना ग्रे हिने यंदाचा ‘मिस युनिव्हर्स’चा ताज पटकावला. या स्पर्धेत सहभागी झालेली भारताची नेहल चुडासमा हिला टॉप -20 मध्येही आपले स्थान राखता आले नाही. ९३ देशांच्या सौंदर्यवतींना मागे टाकत काट्रियोना गे हिने ‘मिस युनिव्हर्स’च्या मुकूटावर आपले नाव कोरले. हा किताब पटकवणारी ती चौथी फिलिपीन्स सौंदर्यवती ठरली आहे. गतवर्षीची ‘मिस युनिव्हर्स’ डेमी लेई नेल्स-पीटर्स हिने काट्रियोनाच्या डोक्यावर मुकूट घातला. दक्षिण आॅफ्रिकेची टॅमरिन ग्रीन या स्पर्धेत फर्स्ट रनर अप तर व्हेनेज्युएलाची स्थेफनी गुटरेज सेकंड रनर अप ठरली.
Miss Universe 2018 is... PHILIPPINES! pic.twitter.com/r2BkN8JpXh
— Miss Universe (@MissUniverse) December 17, 2018
Your first Top 3 contestant is...#MissUniverse PHILIPPINES! 🇵🇭 pic.twitter.com/4wZMahiE8J
— Miss Universe (@MissUniverse) December 17, 2018
२४ वर्षांची उत्तम सूत्रसंचालक, गायिका म्हणूनही प्रसिद्ध आहे. अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिका, व्हिएतनाम, व्हेनेझुएला, कोस्टासारख्या देशांच्या सौंदर्यवतींचे आव्हान तिच्यासमोर होते.
Miss Spain #AngelaPonce is the first transgender contestant at the #MissUniverse and she's a favourite to win. "Trans women have been persecuted and erased for so long. I’m showing that trans women can be whatever they want," she says. https://t.co/k1EywkMgWopic.twitter.com/GqyedDH0DI
— Naila Inayat (@nailainayat) December 13, 2018
या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच स्पेनच्या अँजेलिना पोन्स या ट्रान्सजेंडर सौंदर्यवतीने सहभाग घेतला होता. त्यामुळे यंदाची ही स्पर्धा अनेकार्थाने खास होती. ती स्टेजवर येताच, उपस्थितांनी तिचे जोरदार स्वागत केले. अर्थात अंतिम २० स्पर्धकांमध्ये पोहोचण्यास अँजेलिना अपयशी ठरली होती.
India’s Nehal Chudasama out of Miss Universe 2018#NehalChudasama#MissUniverse
— CineTadka (@CineTadka_com) December 17, 2018
Link: https://t.co/Vnq4Ty9dGUpic.twitter.com/MYqO4IguF5
भारताच्या नेहलनेही चाहत्यांची निराशा केली. फिटनेस कन्सलटंट, होस्ट असलेली आणि मिस दिवा २०१८, मिस युनिव्हर्स इंडिया २०१८ चा किताब जिंकणाऱ्या नेहलने मुंबईच्या ठाकूर कॉलेज आॅफ सायन्स अॅण्ड कॉमर्समधून पदवी घेतली आहे.
नेहल टॉप-२० मधून बाद झाली. आॅस्टेलिया, बेल्जियम, ब्राझिल, कॅनडा, कोस्टा रिका, कुराको, ग्रेट ब्रिटन, इंडोनेशिया, आयर्लंड, नेपाळ, फिलिपीन्स, पोलंड, प्युटरे रिको, दक्षिण आफ्रिका, थायलंड, अमेरिका, व्हेनेझुएला, व्हिएतनाम, जमैकाच्या सौंदर्यवतीने टॉप२० मध्ये स्थान मिळवले.