Join us

कोण होतीस तू, काय झालीस तू...! काही वर्षांपूर्वी 'अशी' दिसत होती Miss Universe हरनाज संधू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 2:40 PM

Harnaaz kaur: आपल्या सौंदर्याच्या जोरावर Miss Universe पर्यंतचा प्रवास गाठणारी हरनाज खऱ्या आयुष्यात अत्यंत साधी असून तिचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

सध्या सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत एकाच व्यक्तीची चर्चा सुरु आहे ती म्हणजे हरनाज संधू (Harnaaz kaur). तब्बल २१ वर्षांनंतर हरनाजमुळे भारताच्या शिरपेचात Miss Universe चा तुरा रोवला गेला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र तिच्या नावाची चर्चा आहे. विशेष म्हणजे वातावरणाविषयी एका प्रश्नाचं उत्तर देत हरनाज ही स्पर्ध जिंकली. त्यामुळे 'ब्रेन विथ ब्युटी' या नावाने ती सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. आपल्या सौंदर्याच्या जोरावर Miss Universe पर्यंतचा प्रवास गाठणारी हरनाज खऱ्या आयुष्यात अत्यंत साधी असून तिचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

12 डिसेंबरला इस्रायलच्या इलियट येथील एका रिसॉर्टमध्ये Miss Universe 2021 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत हरनाज विजेती ठरली असून मॅक्सिकोची माजी मिस यूनिव्हर्स एंड्रिया मेजा हिने हरनाज संधुच्या डोक्यावर ताज चढवला. या स्पर्धेत हरनाजने बाजी मारल्यापासून सोशल मीडियावर ती जोरदार ट्रेंड होत आहे. यात तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत तिच्या पर्सनल लाइफचीही चर्चा रंगली आहे. यामध्येच तिचा कॉलेज जीवनातील एक फोटो समोर आला आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये तिला ओळखणंही कठीण झालं आहे. 

सध्या सोशल मीडियावर हरनाजचा व्हायरल होत असलेला फोटो तिच्या कॉलेज जीवनातील आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड साधी दिसत असून तिच्या चेहऱ्यावरही फारसं तेज वा ग्लॅमरस नसल्याचं पाहायला मिळत आहे. तिचा हा फोटो २०१७ चा आहे.

Miss Universe 2021: 'या' एका उत्तरामुळे हरनाज संधूने पटकावला Miss Universeचा खिताबखऱ्या आयुष्यात हरनाज प्रचंड साधी राहत असून मिस युनिव्हर्ससाठी तिचं बदलेलं रुप पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. परंतु, हरनाज कॉलेज लाइफपासून वेगवेगळ्या सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेत आली आहे.

दरम्यान, हरनाज उच्च शिक्षित असून तिने पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेत आहे.२०१७ मध्ये तिने मिस चंदीगडचा किताब जिंकला होता. त्यानंतर २०१८ मध्ये तिला 'मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८'चा अवॉर्ड मिळाला होता. दोन प्रतिष्ठित खिताब जिंकल्यानंतर, हरनाझने मिस इंडिया २०१९ मध्ये भाग घेतला.  या वर्षी सप्टेंबरमध्ये तिने मिस दिवा युनिव्हर्स इंडिया २०२१ चाही मुकुट पटकावला. 

टॅग्स :मिस युनिव्हर्ससेलिब्रिटीआंतरराष्ट्रीय