जगातील सौंदर्य स्पर्धांमधील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून Miss Universeकडे पाहिलं जातं. ही स्पर्धा जिंकावी अशी जगातल्या असंख्य तरुणींची इच्छा असते. परंतु, या स्पर्धेत सौंदर्यासोबतच स्पर्धकांच सामान्य ज्ञानही पाहिलं जातं. यंदा तब्बल २१ वर्षांनंतर Miss Universe 2021 चा खिताब भारताकडे आला आहे. पंजाबच्या हरनाज संधू (Harnaaz Sandhu) हिने हा खिताब जिंकला असून एका प्रश्नामुळे तिने या स्पर्धेत बाजी मारली. त्यामुळेच नेमक्या कोणत्या प्रश्नामुळे हरनाजने ही स्पर्धा जिंकली तो प्रश्न जाणून घेऊयात.
12 डिसेंबरला इस्रायलच्या इलियट येथील एका रिसॉर्टमध्ये Miss Universe 2021 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत हरनाज विजेती ठरली असून मॅक्सिकोची माजी मिस यूनिव्हर्स एंड्रिया मेजा हिने हरनाज संधुच्या डोक्यावर ताज चढवला.
'या' प्रश्नामुळे हरनाजने जिंकली परिक्षकांची मनं
भारताचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या हरनाजला वातावरण आणि पर्यावरणाशी निगडीत प्रश्न विचारण्यात आला होता. वातावरणातील बदलाकडे ती कसं पाहते असं तिला विचारलं होतं. या प्रश्नावर तिने दिलेल्या उत्तरामुळे परिक्षकांची मनं जिंकण्यास ती यशस्वी ठरली.
''अनेक लोकांना वाटतं की क्लायमेट चेंज ही मोठी समस्या आहे, याबद्दल तुला काय वाटतं?" असा प्रश्न हरनाजला विचारण्यात आला. त्यावर "हवामान बदल ही गंभीर समस्या आहे. त्याबद्दल मला काळजी वाटते. पण यावर आपण काम करणं गरजेचं आहे. हे सारं काही आपल्या निष्काळजीपणामुळे होतंय. तुम्ही केलेल्या कृतीमुळे पर्यावरणाला वाचवता येईल. एखादी गोष्टी नंतर सुधारण्यापेक्षा त्यासाठी आधीच काळजी घेतलेली कधीही उत्तम", असं उत्तर हरनाजने दिलं.
दरम्यान, हरनाजच्या या उत्तराने परिक्षक प्रभावित झाले आणि मिस युनिव्हर्सचा मुकुट हरनाजच्या शिरपेजाच विराजमान झाला. हरनाजने पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या स्पर्धकांना मागे टाकत 'मिस युनिव्हर्स'चा खिताब जिंकला. हरनाजपूर्वी २००० मध्ये अभिनेत्री लारा दत्ताने ही स्पर्धा जिंकली होती.