Join us

Harnaaz Sandhu : मिस युनिव्हर्स ना तू, मग....? भारताची ब्युटी क्वीन हरनाज संधू पुन्हा झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 10:35 AM

Harnaaz Sandhu : ‘मिस युनिव्हर्स 2022’ सोहळ्यातील हरनाजचे एक ना अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि सध्या त्याचीच चर्चा आहे.

Harnaaz Sandhu at Miss Universe 2022: भारताची ब्युटी क्वीन आणि ‘मिस युनिव्हर्स 2021’ हरनाज कौर संधू (Harnaaz Sandhu) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 71 व्या ‘मिस युनिव्हर्स’ या सौंदर्यस्पर्धेचं आयोजन अमेरिकेतल्या लुइजियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्स शहरात करण्यात आलं होतं. ‘मिस युनिव्हर्स 2022’चा किताब अमेरिकेच्या आर बॉनी गॅब्रिएलने जिंकला. माजी मिस युनिव्हर्स हरनाज संधूने तिला मुकूट सोपवला. यासगळ्यात हरनाजवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. ‘मिस युनिव्हर्स 2022’ सोहळ्यातील हरनाजचे एक ना अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि सध्या त्याचीच चर्चा आहे.

होय, हरनाज फायनल वॉकसाठी स्टेजवर आली. यावेळी तिने ब्लॅक कलरचा शिमरी गाऊन परिधान केला होता. हरनाज स्टेजवर येताच तिचं जंगी स्वागत केलं गेलं. यावेळी हरनाजना अश्रू अनावर झालेत. पण याचदरम्यान शेवटचा रॅम्प वॉक करत असताना असं काही झालं की हरनाज पडता पडता वाचली.

हरनाजचे ‘मिस युनिव्हर्स 2022’ सोहळ्यातले व्हिडिओ बघून  नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यादरम्यान काहींनी तिच्या वाढलेल्या वजनावरही कमेंट्स केल्यात.  गेल्या वर्षी मिस युनिव्हर्स झालेल्या हरनाजचं वजन इतकं कसं वाढलं असा सवाल आता तिला नेटकऱ्यांनी विचारण्यास सुरुवात केली आहे. मिस युनिव्हर्स होईपर्यत तू स्वताची चांगली काळजी घेत होतीस मग आता काय झालं अशी कशी तब्येत वाढली असा प्रश्न विचारत युजर्सनी तिला ट्रोल केलं.  

2021 मध्ये हरनाजनं भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता. तिनं मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकत देशाचं नाव उंचावलं होतं. प्रसिद्ध अभिनेत्री लारा दत्तानंतर असा खिताब मिळवणारी ती दुसरीच व्यक्ती होती. त्यामुळं तिचं सगळ्यांना कौतूकही होतं. मात्र आता ती तिच्या फिटनेसमुळे चर्चेत आली आहे.

गेल्यावर्षी हरनाजने केला होता खुलासा...

गेल्यावर्षीही हरनाज वाढलेल्या वजनामुळे ट्रोल झाली होती. यावेळी आपल्याला celiac नावाचा आजार असल्याचा खुलासा तिने केला होता. या आजारामुळे ती गव्हाच्या पीठासोबतच अनेक गोष्टी खाऊ शकत नाही. मिस युनिव्हर्स जिंकल्यानंतर महिनाभर मी पूर्णपणे आराम केला. मी त्याकाळात वर्कआऊट केलं नाही. फक्त कुटुंबासोबत एन्जॉय केलं. हे सगळं माझ्या शरिरावर दिसेल याचा विचारच मी केला नाही आणि वजन वाढलं. लोक मला वाढलेल्या वजनामुळे ट्रोल करतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं, असं ती म्हणाली होती.

टॅग्स :हरनाज संधूमिस युनिव्हर्स