नवी दिल्ली-अमेरिकेच्या लुइसियाना राज्यातील न्यू ऑर्लेअन्स शहरात ७१ व्या मिस युनिव्हर्स पेजेंटचा सोहळा पार पडला. मिस युनिव्हर्स २०२२ ब्युटी पेजेंटची घोषणा करण्यात आली आणि हा मान अमेरिकेच्या किआर बॉने गेब्रियल (R'bonney Gabriel) हिला मिळाला. जगभरातील ८४ स्पर्धकांना मात देत बॉनी ग्रेबियलनं मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला.
मिस युनिव्हर्स २०२१ ची विजेती हरनाज संधू हिच्या हस्ते ग्रेबियल हिला मानाचा मुकूट देण्यात आला. टॉप-३ मध्ये व्हेनेझुएलाची अमांडा डुडामेल न्यूमेन, अमेरिकेची आर बॉनी ग्रेब्रियल आणि डोमिनिकन रिपब्लिकची एंड्रीना मार्टिनेज यांच्यात चढाओढ होती. तर भारताचं प्रतिनिधीत्व करणारी दिविता रायनं टॉप-१६ मध्ये स्थान मिळवलं होतं. पण ती टॉप-५ मधून बाहेर पडली. दिविता टॉप-१६ पर्यंत पोहोचली होती. कॉस्ट्यूम राऊंडमध्ये दिवितानं 'सोन्याची चिमणी' बनून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
नव्या मुकूटाचं वैशिष्ट्यमिस युनिव्हर्ससाठी यंदा सुप्रसिद्ध लग्जरी ज्वेलर्स Mouawad नं डिझाइन केलं आहे. या मुकूटाची किंमत जवळपास ४६ कोटी रुपये इतकी आहे. यात हिरे आणि नीलम जोडलेले आहेत. याशिवाय या मुकुटात पायाच्या आकाराचा एक मोठा नीलमही आहे, ज्याभोवती हिरे जडलेले आहेत. या मुकूटात एकूण ९९३ स्टोन आहेत. ज्यात ११०.८३ कॅरेट नीलम आणि ४८.२४ कॅरेट पांढरे डायमंड आहेत. मुकूटाच्या सर्वात वरच्या बाजूला रॉयल ब्लू रंगाचा नीलम ४५.१४ कॅरेट आहे.