देश-विदेशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या वाढू लागलीये आणि यामुळे ‘मिस वर्ल्ड 2021’ (Miss World 2021) ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक सौंदर्यवती, तसंच स्पर्धेशी संबंधित कर्मचा-यांना कोविड-19चा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कोरोनाचा संगर्ग झालेल्यांमध्ये ‘मिस वर्ल्ड 2021’स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणारी मानसा वाराणसी (Manasa Varanasi) हिचाही समावेश आहे.
मानसा वाराणसी ‘मिस इंडिया वर्ल्ड 2020’ या स्पर्धेची विजेती ठरली होती. यानंतर ती ‘मिस वर्ल्ड 2021’स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. मानसा हिच्यासह ‘मिस वर्ल्ड 2021’ स्पर्धेतील 17 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
‘मिस वर्ल्ड 2021’च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून करण्यात आली आहे. आयोजकांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ज्या 17 व्यक्तींची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, त्यात मानसा वाराणसी हिचाही समावेश आहे. मानसाने याआधी ‘मिस तेलंगणा’ हा किताब जिंकला होता. पेशाने ती फायनान्शिअल एक्सचेंज इन्फॉर्मेशन अॅनालिस्ट आहे. वाचन, गाणी ऐकणे, डान्स आणि योगा हे तिचे छंद आहेत.
कोरोनाचा हा ब्लास्ट बघता,‘मिस वर्ल्ड 2021’ अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. 90 दिवसांच्या आत प्युअर्टो रिकोमध्ये या स्पधेर्चं नवं वेळापत्रक ठरवलं जाणार आहे. सर्व बाधित सौंदर्यवती आणि कर्मचा-यांची आवश्यक ती वैद्यकीय काळजी घेतली जात असून, कोरोना संसर्ग आणखी पसरू नये, यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.
अलीकडेच झालेल्या ‘मिस युनिव्हर्स 2021’ स्पर्धेत भारताच्या हरनाझ संधूने किताब पटकावून इतिहास रचला होता. त्यानंतर सर्वांचं लक्ष ‘मिस वर्ल्ड 2021’स्पर्धेकडे लागलं होतं. भारताची मानसा या स्पर्धेत काय कामगिरी करते, याकडे भारतीयांच्या नजरा होत्या.