Krystyna Pyszkova Miss World 2024 winning answer: मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा भारतात काल संपन्न झाली. भारत मंडपम, नवी दिल्ली येथे अनेक दिवस ही स्पर्धा सुरु होती. त्यानंतर काल ९ मार्चच्या रात्री, मिस वर्ल्ड 2024 च्या विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. 71व्या मिस वर्ल्डचा किताब चेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टिना पिस्कोव्हा हिच्याकडे गेला. टॉप 4 मध्ये आपले स्थान निर्माण केल्यानंतर क्रिस्टीनाने शेवटच्या फेरीत सुंदर उत्तर दिले आणि किताब जिंकला. चला जाणून घेऊया कोणत्या उत्तरामुळे क्रिस्टीना मिस वर्ल्ड बनली.
काय होता प्रश्न?
मिस वर्ल्ड 2024च्या शेवटच्या फेरीत भारताच्या शार्क टँकच्या शार्कना बोलवण्यात आले. त्यानंतर मिस वर्ल्ड 2013 मेघन हिने चेक रिपब्लिक, त्रिनिदाद आणि टोबॅगो, बोत्सवाना आणि लेबनॉन मधील टॉप 4 स्पर्धकांना सांगितले की, पुढची मिस वर्ल्ड म्हणून तुम्हा सर्वांना शार्क टँक इंडियाच्या शार्क्स समोर पिच करावे लागेल आणि त्यासाठी तुम्हाला फक्त ६० सेकंद मिळतील.
क्रिस्टीनाच्या उत्तराने मारली बाजी
क्रिस्टिना पिस्कोवा मिस वर्ल्ड 2024 शार्क टँक इंडियाच्या शार्क समोर म्हणाली- कल्पना करा की तुम्ही लहान आहात आणि तुमच्याकडे काही स्वप्ने आणि काही आशा आहेत. पण जसजसे तुम्ही मोठे होता तसतशी तुमची स्वप्ने मागे पडतात. आता कल्पना करा की तुम्ही पालक आहात आणि तुमचे मूलही तुम्ही ज्या परिस्थितीतून गेलात, त्याच परिस्थितीतून जात आहात. जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपली ती स्वप्ने अधिक दूर जातात. अनेक मुलांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी चांगले शिक्षण घेता येत नाहीत. आजही २०२४ मध्ये, २५० मिलियन मुले आहेत शाळेत जाऊ शकत नाहीत आणि गरीब मुलांना दर्जेदार शिक्षण देणे हे माझ्या अभियानाचे उद्देश आहे.
क्रिस्टीना पुढे म्हणाली- 'माझा विश्वास आहे की शिक्षण हा प्रत्येक मुलाचा घटनात्मक अधिकार आहे आणि मी इथे त्या मुलांच्या बाजूने बोलायला उभी आहे. मी या स्पर्धेत येण्याच्या खूप आधीपासून हे करते आहे. कारण मला ते मनापासून करावेसे वाटते. मी मिस वर्ल्डचा जिंकले किंवा नाही जिंकले तरीही मी हे करतच राहीन. खूप खूप धन्यवाद.
क्रिस्टीना पिस्कोवाच्या या उत्तराला साऱ्यांचीच वाहवा मिळाली आणि त्याच उत्तराने तिला मिस वर्ल्ड 2024चा किताब जिंकवून दिला.