Join us

लग्नानंतर नव्या आयुष्याची सुरूवात मिताली मयेकरने केली मेकओव्हरने, शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 12:56 PM

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरचे नुकतेच पुण्यातील ढेपेवाड्यात लग्न पार पडले.

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरचे नुकतेच पुण्यातील ढेपेवाड्यात लग्न पार पडले. या लग्नाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नानंतर नवीन आयुष्याची सुरूवात मिताली मयेकरने मेकओव्हरने केली आहे. तिने तिच्या या मेकओव्हरचे फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. तिचा हा मेकओव्हर पाहून तिचे चाहते थक्क झाले आहेत.

मिताली मयेकर हिने इंस्टाग्राम स्टोरीवर तीन फोटो शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोत ती सलूनमध्ये बसलेली दिसते आहे. दुसऱ्या फोटोत तिच्या कापलेल्या केसांची शेंडी हातात पहायला मिळते आहे. तर तिसऱ्या फोटोत तिचा नवा हेअर कट पहायला मिळतो आहे. तिचा हा नवा लूक तिच्या चाहत्यांना खूप भावला आहे. 

सिद्धार्थ चांदेकरने नुकताच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. हा फोटो मिताली मयेकरने क्लिक केला आहे. या फोटो पाहिल्यावर समजते आहे की लग्नानंतर सिद्धार्थ आणि मिताली लोणावळा येथील मचान या रिसॉर्टला गेले आहेत. तर आता मितालीने देखील चिल मारतानाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

पुण्यातील ढेपेवाडीत सिद्धार्थ व मितालीचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या लग्नसोहळ्यात मितालीने हिरव्या रंगाची नऊवारी नेसली होती. नाकात नथ, हातात हिरवा चुडा, माथ्यावर बाशिंग असा तिचा लूक होता.

तर सिद्धार्थने जांभळ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान केले होते. या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अभिनेता उमेश कामत, अभिज्ञा भावे, पूजा सावंत, भूषण प्रधान असे अनेक सेलिब्रिटी यावेळी हजर होते.

लग्न ठरल्यापासून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट सिद्धार्थ व मिताली चाहत्यांसह शेअर करत होते. त्यांच्या हळदीचे, मेहंदीचे, संगीत सेरेमनीचे अनेक फोटो याआधीच व्हायरल झाले होते. या फोटोंमधील सिद्धार्थ आणि मितालीच्या केमिस्ट्रीची सगळीकडे चर्चा रंगली होती.

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकर