अभिनेत्री मिथीला पालकर आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही नेहमीच सजग आहे. कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते. विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. मिथिलाने नुकतेच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मिथिलाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केले आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मिथिलाचे सौंदर्या आणखी खुलले आहे. तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.
'गर्ल इन द सिटी' आणि 'लिटील थिंग्स' या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर हिने मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे. कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते.