Mithila Palkar : गणेशोत्सव हा सण चैतन्याचे आणि ऊत्साहाचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात हा सण खुप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) हा कलाकार मंडळींसाठी खूप खास आहे. अशातच आता अभिनेत्री मिथिला पालकर हिने पोस्ट केलेल्या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
गणेशोत्सवात घरोघरी नैवेद्य म्हणून तयार होणाऱ्या मोदकांची भर असते. घरोघरी बाप्पाासाठी मोदक तयार केले जात आहे. मिथिलानं हिनं देखील गणपती बाप्पासाठी पहिल्याच प्रयत्नात अगदी सुंदर कळीदार मोदक बनवले आहे. याचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती मोदक तयार करताना दिसतेय. मिथिलानं खूप चांगल्या पद्धतीने मोदकामध्ये सारण भरले आहे आणि मोदकाला कळा पाडल्या आहेत.
सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "गणपती बाप्पा मोरया! Wishing you a plateful of मोदक with masta साजुक तूप. मी यापूर्वी कधीही मोदक बनवले नव्हते. पण या वर्षी मी घरी होते आणि माझ्या बाप्पासाठी मला काहीतरी करायचं होतं. त्यामुळे माझ्या घरी रोज मदत करायला येणाऱ्या माझ्या ताई आणि व्हिडीओ कॉल्सवरुन आईच्या सूचनानुसार, अनेक युट्यूबवरील व्हिडीच्या मदतीने मी पहिल्यांदा मोदक बनवलेत".
मिथिला पालकरचा हा व्हिडीओ चाहत्यांना पसंती पडला आहे. यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. मिथिला पालकर हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक लोकप्रिय नाव आहे. आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला. वेगवेगळे मराठी चित्रपट, मालिका तसेच वेबसीरीजमध्ये तिने काम केलं आहे. दमदार अभिनयाच्या जोरावर मिथिलाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं.