Join us

आमिर खानच्या लेकीच्या लग्नात मराठी कलाकारांची हजेरी; फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 12:13 IST

आयरा आणि नुपूरच्या लग्नाला मराठी कलाकारांनी हजेरी लावली.

बॉलिवूडचा मिस्टर 'परफेक्शनिस्ट' अर्थात अभिनेता आमिर खानची लाडकी लेक आयरा खान अखेर आज विवाहबंधनात अडकली. आयराने तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये कोर्ट मॅरेज केले. आयरा आणि नुपूरच्या लग्नाला मराठी कलाकारांनी हजेरी लावली. या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर कमेंट्स करत दोघांचेही चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

आमिरच्या लेकीच्या लग्नात अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर, प्राजक्ता कोळी, सारंग साठ्ये व त्याची पत्नी पॉला मॅकग्लेन हे उपस्थित होते. आयरा आणि नुपूरच्या लग्नात या कलाकार मंडळींनी मजा-मस्ती केली.

नुपूरच्या  वरतीतही त्यांनी जोरदार डान्सही केला. मिथिलाने गडद लाल रंगाची साडी नेसली होती. तर सारंग व पॉला यांची जोडीही सुंदर दिसत होती. आयराच्या लग्नातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

आयरा आणि नुपूर गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मे महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला होता. आता कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न उरकत त्यांनी आयुष्यभरासाठी एकमेकांचे जोडीदार झाले आहेत. आयरा खान आणि नुपूर शिखरे लग्नामध्ये खूपच सुंदर दिसत होते. नववधूच्या रुपामध्ये आयरा खूपच क्युट दिसत होती. तर नुपूरने डार्क ब्लू कलरची शेरवानी परिधान केली होती.

टॅग्स :इरा खानसेलिब्रिटीबॉलिवूडमराठी अभिनेतामिथिला पालकर