भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. संपूर्ण देशात रोज नवे तीन लाखांवर रूग्ण सापडत आहेत. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूड सुपरस्टार व भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनाही कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली आणि चाहत्यांना धक्का बसला. मात्र काही तासांतच ही बातमी अफवा असल्याचे सिद्ध झाले.दुपारी मिथुन चक्रवर्ती यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली. सोशल मीडियावर ही बातमी लगेच व्हायरलही झाली. मिथुन चक्रवर्ती होम क्वारंटाइनमध्ये असल्याचा दावाही या बातमीत करण्सात आला. मात्र सरतेशेवटी ही बातमी खोटी असल्याचे सिद्ध झाले. खुद्द मिथुन यांनी ही अफवा असल्याचे स्पष्ट केले.
मी तर सुट्टी एन्जॉय करतोय...फिल्मफेअरशी बोलताना मिथुन यांनी कोरोना लागण झाल्याचे स्पष्टपणे नाकारले. मला अजिबात कोरोना वगैरे झालेला नाही़ मी तर सुट्टी एन्जॉय करतोय. महिनाभरापासून पश्चिम बंगालमध्ये प्रचार केल्यानंतर आता मी बेउली दाळ व आलू पोस्टो खात मजेत सुट्टी घालवतोय, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर गेल्या महिनाभरापासून मिथुन पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचार करत होते.मिथुन चक्रवर्ती यांनी दोन महिन्यांपूर्वीच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोठी यांच्या सभेदरम्यान मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपचे कमळ हाती घेतले होते.