आणखी एका स्टारकिड्सची नेटीझन्सना भुरळ, लवकरच बॉलीवुडमध्ये करणार पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 07:00 AM2020-11-17T07:00:00+5:302020-11-17T07:00:00+5:30
स्टार किड असूनही दिशानी स्वतःला कॅमेऱ्यापासून दूर ठेवते. दिशानीला तिचे वडिल मिथुन चक्रवर्ती आणि भाऊ माशी चक्रवर्तीप्रमाणे अभिनय श्रेत्रात करियर करायचं आहे.
बी-टाऊन असो किंवा मग सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. आपल्या पालकांपेक्षा हम भी कुछ कम नहीं असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत. आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलं मुलीसुद्धा अभिनय क्षेत्रात एंट्री मारणं ही काही नवी बाब राहिली नाही. बॉलिवूड अभिनेते मिथुनी चक्रवर्ती यांची मुलगी दिशानी चक्रवर्तीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून तिच्या फोटोला चांगलीच पसंती मिळतेय.दिशानी सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामवर सतत ऍक्टिव्ह असते.
74 हजारहून अधिक तिचे इन्स्टा फॉलोवर्स आहेत. तिचे ग्लॅमरस फोटो पाहून नेटीझन्सनाही तिच्या लूकची भुरळ पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिचा प्रत्येक अंदाज भलताच भाव खाऊन गेला. आपली फॅशन, स्टाईल याबाबत दिशानी बरीच सजग असते. कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल, फॅशन याची दिशानी विशेष खबरदारी घेते.
स्टार किड असूनही दिशानी स्वतःला कॅमेऱ्यापासून दूर ठेवते. दिशानीला तिचे वडिल मिथुन चक्रवर्ती आणि भाऊ माशी चक्रवर्तीप्रमाणे अभिनय श्रेत्रात करियर करायचं आहे. सध्या न्यूयॉर्कमध्ये फिल्म अकॅडमीमधून ती अभिनयाचं शिक्षण घेत आहे. दिशानीने यापूर्वी शॉर्ट फिल्म्समध्येही काम केलं आहे. आता पुढे बॉलिवूडमध्येही ती आपले नशीब आजमवताना दिसणार आहे.
एकेकाळी बॉलिवूड प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या मिथुन चक्रवर्ती यांनी अनेक हिट चित्रपट दिलेत. पण रिल लाईफपेक्षा त्यांची रिअल लाईफ अधिक चर्चेत राहिली. श्रीदेवी आणि मिथुन यांच्या लव्ह लाईफचे किस्से सगळ्यांनाच ठाऊक आहेत. मिथुन यांनी श्रीदेवींशी गुपचूप लग्न केले होते, असे म्हटले जाते. पण श्रीदेवींआधी मिथुनदांनी दोन लग्ने केली होती. होय, मिथुनदांच्या पत्नी योगिता बाली यांच्याविषयी आपण सगळेच जाणतो.
1979 मध्ये मिथुन यांनी योगिता बाली यांच्याशी लग्न केले होते. आजही दोघे सोबत आहेत. पण योगिता बाली यांच्याआधी मिथुन यांची पहिली पत्नीही होती. तिचे नाव आहे हेलेना ल्यूक.मिथून यांची पहिली पत्नी हेलेना ही सुद्धा अभिनेत्री होती. सत्तरीच्या दशकात हेलेना हे फॅशन वर्ल्डमध्ये प्रसिद्ध असे नाव होते. 1980 साली ‘जुदाई’ या चित्रपटात तिने अभिनयही केला होता. यानंतर ‘साथ साथ’ आणि ‘एक नया रिश्ता’ चित्रपटातही ती झळकली. पण याऊपरही हेलेना फार काळ बॉलिवूडमध्ये टिकू शकली नाही.