Join us

मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाअक्षयला अटकपूर्व जामीन मंजूर; पण लग्न झाले रद्द!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 9:42 AM

बॉलिवूड सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती याचा मुलगा महाअक्षय चक्रवर्ती याला अखेर न्यायालयाने सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला. 

बॉलिवूड सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती याचा मुलगा महाअक्षय चक्रवर्ती याला अखेर न्यायालयाने सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला. एका भोजपुरी अभिनेत्रीने महाअक्षयवर बलात्कार, फसवणूक व गर्भपात करण्यास सक्ती केल्याचा आरोप ठेवला आहे. महाअक्षयची आई योगिता बाली यांच्यावरही पीडितेने धमकावल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी गत ५ जुलैला मुंबई उच्च न्यायालयाने महाअक्षय व योगिता बाली यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. विशेष म्हणजे ७ जुलैला महाअक्षयचे लग्न होते. लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी अटकपूर्व जामीन न मिळाल्याने ऐनवेळी महाअक्षयचे लग्न रद्द करण्यात आले. यादरम्यान महाअक्षयने दिल्लीच्या रोहिणी कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. त्यानुसार, काल रोहिणी कोर्टाने महाअक्षयला अंतरिम जामीन मंजूर केला.

‘यस बॉस’, ‘नदिया के पार’ फेम अभिनेत्री शीला शर्मा यांची मुलगी मदालसा शर्मासोबत महाअक्षयचे लग्न ठरले आहे.  पण ऐन लग्नाच्या तोंडावर महाअक्षयवर बलात्कारासारखा गंभीर आरोप झाल्याने हे लग्न होणार की नाही, याबद्दल संशय निर्माण झाला होता. पण हे लग्न होणार, असे महाअक्षयची भावी सासू शीला शर्मा यांनी स्पष्ट केले होते. काय आहे प्रकरणसंबंधित पीडित भोजपुरी अभिनेत्रीनेमहाअक्षयवर बलात्काराचा आरोप केला आहे. तिने तक्रारीत म्हटले आहे की, मी एप्रिल २०१५मध्ये महाअक्षयला भेटले. मे २०१५ मध्ये त्याने मला नशा देऊन माझ्यावर बलात्कार केला. पुढेही मी त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहिले. कारण त्याने मला लग्नाचे वचन दिले होते. पण मी प्रेग्नंट राहिल्यावर त्याने माझ्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव आणला. मिथुनची पत्नी व महाअक्षयची आई योगिता बाली हिनेही आपल्याला धमकावले. यापश्चातही महाअक्षय लग्नाचे वचन देत राहिला. मी आईबाबांना समजावेल, असे तो मला म्हणाला. पण वेळ आल्यावर कुंडली जमत नसल्याचे सांगून त्याने लग्नास नकार दिला.

 

टॅग्स :मिथुन चक्रवर्ती