Join us

फराळ, चांदीचा दिवा अन्...; राज ठाकरेंकडून विशाखा सुभेदारला दिवाळीची खास भेट, अभिनेत्री म्हणाली, "साहेब..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 08:42 IST

Diwali 2023: राज ठाकरेंकडून विशाखाला दिवाळीची खास भेट, अभिनेत्री भारावली, म्हणाली, "एक मनसे कार्यकर्ती म्हणून..."

देशात सर्वत्रच दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सगळीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीही जल्लोषात दिवाळी साजरी करतात. ठिकठिकाणी दिवाळीनिमित्त मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. आपल्या मित्रपरिवाराला आणि  कुटुंबीयांना दिवाळीच्या खास भेटवस्तूही दिल्या जातात. कलाकार आणि राजकीय मंडळीही दिवाळीनिमित्त मित्रमैत्रिणींना भेटवस्तू देत नात्यातील गोडवा जपण्याचा प्रयत्न करतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दरवर्षी जवळच्या व्यक्तींना खास गिफ्ट पाठवत दिवाळीच्या शुभेच्छा देतात.यंदा त्यांनी लोकप्रिय अभिनेत्री विशाखा सुभेदारलाही खास भेटवस्तू पाठवली आहे. 

राज ठाकरेंकडून विशाखाला दिवाळीचा फराळ, चांदीचा दिवा, मेणाचे दिवे असं खास गिफ्ट देण्यात आलं आहे. विशाखाने सोशल मीडियावर याचा फोटो शेअर केला आहे.राज ठाकरेंकडून मिळालेली दिवाळीची भेट पाहून विशाखा भारावून गेली आहे. हा फोटो शेअर करत तिने खास पोस्टही लिहिली आहे. "साहेब मनापासून धन्यवाद..! तुमची गोष्टच भारी. इतकं लक्षात ठेवून डायरेक्ट घरी फराळ पाठवला. त्याबद्दल एक मनसे कार्यकर्ती म्हणून खूप आनंद झाला," असं विशाखाने पोस्टमध्ये लिहिलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

विशाखा ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक मालिका आणि कॉमेडी शोमध्ये काम केलं आहे. विशाखाने खडतर प्रवास करून कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करत नाव कमावलं. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. अनेक चित्रपटांतही विशाखा महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली. सध्या विशाखा 'शुभविवाह' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 

टॅग्स :दिवाळी 2023सेलिब्रिटींची दिवाळीराज ठाकरेमराठी अभिनेता