ने हा धूपिया सध्या चर्चेत आहे, ती तिच्या ‘नो फिल्टर नेहा’ या आॅडिओ शोमुळे. तिचा हा शो भलताच लोकप्रिय झालाय. अर्थात आम्ही या शोबद्दल नाही, तर वेगळ्याच एका विषयावर बोलणार आहोत. हा विषय जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असालच. आम्ही आज ज्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, तो विषय आहे, नेहाची चॉईस. होय, मोबाईल, वाईन किंवा एखादे बुक किंवा मेल फ्रेंड निवडायचा झाल्यास नेहा कशी निवडते? या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच नेहाची चॉईस जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आम्ही तुम्हाला याच प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. मोबाईल, वाईन, बुक किंवा मेल फ्रेंड निवडण्याची एक सोपी पद्धत नेहाकडे आहे. अलीकडे एका सेल फोन लाँचला नेहा पोहोचली. या वेळी तिने यासाठी ती वापरत असलेली एक सोपी ट्रिक सांगितली. कुठलाही पुरुष, मोबाईल आणि वाईन निवडताना मी केवळ लुक्स बघते, असे ती म्हणाली. आय चूज दी बुक बाई जजिंग इट्स कव्हर. मला कुणीही इंप्रेस करण्याचा प्रयत्न करणार असेल, तर त्याचे लुक्स चांगले असायला हवे. एखादा पुरुष मित्र असो, वाईन असो किंवा एखादे पुस्तक, त्याकडे बघितल्यावर चांगली फिलिंग यायला हवी. लुक्स आणि फिलिंग या दोनच गोष्टींच्या आधारावर मी माझा मोबाईल, वाईन आणि मेल फ्रेंड निवडते,असे तिने सांगितले.
मोबाईल, वाईन आणि मित्र!
By admin | Published: February 18, 2017 6:18 AM