‘जन्नत-२‘, ‘राज-३’सारख्या बॉलीवूड चित्रपटांमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी ईशा गुप्ता तिच्या मॉडेलिंग करिअरचे आभार मानते. नुकतेच ईशाचा ‘हमशकल्स हा चित्रपट रिलीज झाला होता. चित्रपट अपयशी ठरला; पण चित्रपटाच्या निमित्ताने ती पुन्हा चर्चेत आली. मॉडेलिंग करिअरबाबत ईशा म्हणते की, ‘मी माझ्या करिअरची सुरुवात एका फॅशन मॉडेलच्या रूपात केली होती. मी नेहमीच शो टॉपर असायचे. याच गोष्टीमुळे मला अभिनेत्री बनण्याची संधी मिळाली. आजही रँपवर जाण्यापूर्वी मी नर्व्हस असते.’ ‘हमशकल्स’ या चित्रपटाच्या अपयशानंतर ईशा आता हॉलीवूड चित्रपटात पदार्पण करीत आहे. या हॉलीवूड चित्रपटाचे चित्रीकरण आॅक्टोबरमध्ये सुरू होणार आहे.
बॉलीवूड करिअरचे श्रेय मॉडेलिंगला : ईशा
By admin | Published: August 13, 2014 9:01 AM