मोगँबोची भूमिका साकारणारे अभिनेते अमरिश पुरी यांची आजही तितकीच क्रेझ आहे. अमरिश पुरी यांचा बुलंद आवाज आणि त्यांच्या खलनायकी भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. अमरिश पुरी यांनी अभिनय केलेले 'नायक', 'मिस्टर इंडिया', 'चायना गेट', 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हे सिनेमे प्रेक्षकांचे मोस्ट फेव्हरेट सिनेमे म्हणून ओळखले जातात. अमरिश पुरी यांची पुढची पिढी अभिनय क्षेत्रात सक्रीय आहे फार कमी जणांना ठाऊक असेल. अमरिश यांचा नातू सध्या मनोरंजन विश्वात चांगलाच चर्चेत आहेत. त्याविषयी जाणून घ्या.
अमरिश पुरी यांचा नातू काय करतो?
अमरिश पुरी यांच्या नातवाचं नाव आहे वर्धन पुरी. वर्धन सुद्धा बॉलिवूडमध्ये चांगलाच सक्रीय आहे. वर्धन अलीकडेच एका फॅशन शोमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी त्याच्या स्टायलिश अदांनी सर्वांचं लक्ष वेधलं. वर्धन पुरीने फॅशन शोमध्ये केलेला रँप वॉक त्याच्या रुबाबदार पर्सनॅलिटीला चांगलाच शोभून दिसतोय. वर्धन पुरीने २०१९ 'ये साली आशिकी' या बॉलिवूड सिनेमातून पदार्पण केलं. याशिवाय 'ब्लडी इश्क' या सिनेमातही वर्धनने साकारलेली भूमिका लोकांच्या लक्षात राहिली.
साऊथ सिनेमांतही वर्धन झळकला?
हैदराबाद मीडियानुसार वर्धन पुरी आता साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. 'जगदेका वीरुडु अथिलोका सुंदरी' या साऊथ सिनेमात वर्धन पुरी काम करणार आहे. हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. त्यामुळे आता वर्धनच्या साऊथ सिनेमातील पदार्पणाची सर्वांना उत्सुकता आहे. वर्धन सध्या आजोबांच्या पावलांवर पाऊल टाकून मनोरंजन विश्वात स्वतःची ओळख मिळवतोय. वर्धन पुरी भविष्यात मनोरंजन क्षेत्रात आणखी कशी चमकदार कामगिरी करतो, याची सर्वांना उत्सुकता आहे.