Join us

Mohammed Rafi birthday: अन् मोहम्मद रफींनी जगापासून लपवली पहिल्या लग्नाची गोष्ट...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 12:25 PM

आज (२४ डिसेंबर) मोहम्मद रफी यांचा वाढदिवस. ‘तुम मुझे यूं भुला ना पाओगे...’ हे रफी यांनी स्वत: गायलेले गीत त्यांच्या आयुष्याला अगदी चपखल लागू पडते.

ठळक मुद्देवयाच्या १३ व्या वर्षी रफींनी पहिल्यांदा जाहीर व्यासपीठावर गाणे गायले आणि यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या संगीतकार श्याम सुंदर यांना त्यांचे गाणे आवडले. श्याम सुंदर यांनी रफींना मुंबईत बोलावले.

शास्त्रीय संगीत, गझल, कव्वाली, ठुमरी, भजन, पार्श्वगायन अशा अनेक संगीत शैलीत स्वैर मुशाफिरी करणारा अवलिया मोहम्मद रफी आज आपल्यात नाहीत. पण त्यांची यादगार गाणी मात्र कायम आपल्यासोबत असतील. संगीतप्रेमींच्या मनात मोहम्मद रफी हे नाव कायम जिवंत असेल. आज (२४ डिसेंबर) मोहम्मद रफी यांचा वाढदिवस. ‘तुम मुझे यूं भुला ना पाओगे...’ हे रफी यांनी स्वत: गायलेले गीत त्यांच्या आयुष्याला अगदी चपखल लागू पडते. या अवलियाच्या गाण्यांबद्दल सगळ्यांना ठाऊक आहे. पण त्यांच्या आयुष्याबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे.  

२४ डिसेंबर १९२४ रोजी पंजाबच्या कोटला सुल्तान सिंह येथे मोहम्मद रफी यांचा जन्म झाला.  त्यांच्या घरी सहा भावंडांमध्ये रफी जी सर्वात लहान होते. लहानपणी त्यांच्या घराजवळून एक फकीर गाणं गात जायचा.  रफी त्या फकिराच्या मागे जाऊन गाणी ऐकायचे. याच फकीराकडून मोहम्मद रफी यांना गाण्याची प्रेरणा मिळाली.

पुढे रफी यांचे वडील लाहोर मध्ये राहायला आले. लाहोरमध्ये एक अशी घटना घडली ज्यामुळे रफी यांचा आवाज सगळ्यांसमोर आला. त्या काळातले मोठे गायक के. एल. सहगल यांचा लाहोर मध्ये एक कार्यक्रम होता, सहगल स्टेजवर जाणार नेमक्या त्यावेळी तिथले लाईट गेले. सहगल मोठे कलाकार त्यामुळे आता वेळ कशी मारून न्यायची, असा प्रश्न आयोजकांना पडला. त्याक्षणी रफी यांच्या एका नातेवाईकाने आयोजकांना मोहम्मद रफी यांच्याविषयी सांगितले. आयोजकांनी त्यावेळी  मोहम्मद रफी यांना गाणं गायची संधी दिली, आणि उपस्थित प्रेक्षकांना रफी यांचा आवाज खूप आवडला. तिथून रफी यांची खºया अर्थाने सुरुवात झाली.

मोहम्मद रफी यांनी दोन लग्न केली होती. पण पहिल्या लग्नाची गोष्ट त्यांनी जगापासून लपवली. या लग्नाबद्दल केवळ त्यांचे घरचे लोक तेवढेच जाणून होते. पुढे मोहम्मद रफी यांची सून यास्मिन खालिद रफी यांनी याचा खुलासा केला. यास्मिनच्या ‘मोहम्मद रफी मेरे अब्बा, एक संस्मरण’ या पुस्तकात रफी यांच्या पहिल्या लग्नाचा उल्लेख आहे. त्यानुसार, रफीचे पहिले लग्न १३ व्या वर्षीचं झाले होते. १३ वर्षांच्या वयात आपल्या काकाची मुलगी बशीरा बानोसोबत रफी यांचे लग्न झाले होते. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. कारण बशीराने रफी यांच्यासोबत भारतात येण्यास नकार दिला. भारत व पाकिस्तान फाळणीदरम्यानच्या दंगलीत बशीराच्या आईवडिलांचा मृत्यू झाला होता. या घटनेने बशीरा इतकी घाबरली होती की, तिने भारतात येण्यास नकार दिला व लाहोरमध्ये राहिली.  

१९४४ मध्ये वयाच्या २० वर्षी रफी यांनी सिराजुद्दीन अहमद बारी आणि तालिमुन्निसा यांची मुलगी बिलकिससोबत दुसरे लग्न केले. रफी यांच्या घरात त्यांच्या पहिल्या पत्नीचा उल्लेखही व्हायचा नाही. कारण बिलकिस बेगम हिला तिचा उल्लेखही आवडायचा नाही. कुणी चर्चा केली तर ही केवळ एक अफवा आहे, असे म्हणून रफी व बिलकिस दोघेही गोष्ट उडवून लावायचे. दुसºया पत्नीपासून बिलकिस यांनाा खालिद, हामिद व शाहिद हे तीन मुले आणि परवीन, नसरीन व यास्मिन अशा तीन मुली झाल्यात. रफी यांची तिन्ही मुले आज हयात नाहीत.

वयाच्या १३ व्या वर्षी रफींनी पहिल्यांदा जाहीर व्यासपीठावर गाणे गायले आणि यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या संगीतकार श्याम सुंदर यांना त्यांचे गाणे आवडले. श्याम सुंदर यांनी रफींना मुंबईत बोलावले. त्यानंतर ‘सोनिये नी हिरीये नी’ हे पहिले गाणे रफींनी ‘गुल बलोच’ या पंजाबी सिनेमासाठी गायले. १९४४ साली नौशाद यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘हिन्दुस्तान के हम है पहले आप के लिए गाया’ हे पहिले हिंदी गाणे गायले आणि नंतर असंख्य गाण्यांमधून आपल्या आवाजातली जादू त्यांनी दाखवून दिली.

  

टॅग्स :मोहम्मद रफी