Join us

मोहनीश बहल 'ह्या' चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 4:20 PM

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरच्या 'पानिपत' या बहुचर्चित चित्रपटामधून मोहनीश बहल रुपेरी पडद्यावर पुनरागमन करतो आहे.

ठळक मुद्देमोहनीश बहल पहिल्यांदाच करणार ऐतिहासिक चित्रपटात काममोहनीश बहल दिसणार बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब यांच्या भूमिकेत

अभिनेता मोहनीश बहलने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. मोहनीश बऱ्याच कालावधीपासून सिनेसृष्टीतून गायब होता. आता तो पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. संजय दत्त, अर्जुन कपूर आणि क्रिती सनॉन यांच्या बहुचर्चित 'पानिपत'मधून मोहनीश पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला रुपेरी पडद्यावर येत आहे.

अर्जुन कपूर आणि क्रितीने 'पानिपत' चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर आधीच पोस्ट केली होती. त्यामध्ये आता मोहनीशचे अजून एक नाव जोडले गेले आहे. इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये मोहनीश बहलने एकाही पौराणिक वा ऐतिहासिक चित्रपटामध्ये काम केलेले नाही. पानिपत हा त्याचा पहिलाच ऐतिहासिक  चित्रपट असणार आहे. आशुतोष गोवारीकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब यांची भूमिका मोहनीश करणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. अर्जुन साकारत असलेल्या सदाशिवराव भाऊच्या चुलत भावाची भूमिका मोहनीश साकारणार असून यामध्ये गोपिकाबाईचा नवरा जी भूमिका पद्मिनी कोल्हापुरे साकारणार आहे.यासंदर्भात आशुतोष गोवारीकर यांची पत्नी सुनिता गोवारीकर चित्रपटाची निर्माती असून तिने नानासाहेब ही भूमिका अतिशय महत्त्वाची असून मोहनीश अतिशय प्रतिभाशाली कलाकारांपैकी एक असल्याचे सांगितले आहे. त्याचा अनुभव या व्यक्तिरेखेसाठी त्याला नक्कीच कामी येईल व तो या व्यक्तिरेखेला योग्य न्याय देईल, असा विश्वासही सुनिताने व्यक्त केला आहे. मोहनीश बहलचे चाहते त्यांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 

टॅग्स :मोहनिश बहलपानिपत