Join us

‘कुल्फी कुमार बाजेवाला’मध्ये मोहित मलिकचा दिसणार नवा लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 06:30 IST

अभिनेता मोहित मलिक सध्या स्टारप्लसवरील दैनंदिन मालिका ‘कुल्फी कुमार बाजेवाला’मध्ये सिकंदर सिंग गिलची भूमिका करत आहे.

ठळक मुद्देमोहित पूर्णपणे नवीन अवतारात दिसणार आहे शोमधील सध्याच्या ट्रॅकनुसार सिकंदरचा अपघात होतो

अभिनेता मोहित मलिक सध्या स्टारप्लसवरील दैनंदिन मालिका ‘कुल्फी कुमार बाजेवाला’मध्ये सिकंदर सिंग गिलची भूमिका करत आहे. आता तो एका पूर्णपणे नवीन अवतारात दिसून येईल. आधी रॉकस्टारच्या रूपातील ह्या अभिनेत्याच्या नवीन रूपात त्याच्या चेहऱ्यावर व्रण दिसून येतील. 

शोमधील सध्याच्या ट्रॅकनुसार सिकंदरचा अपघात होतो. त्यानंतर तो घरी येतो पण त्याच्या वागण्यात कमालीचा बदल होतो. सिकंदरला काहीही फरक पडत नाही, पण कुल्फी, अमायरा, लव्हली आणि अगदी त्यांचा कुत्रा जॉनीसुद्धा त्याला ओळखत नाहीत. मोहित आपल्या नवीन लूकबद्दल अतिशय उत्साहात असून ह्या शोमधील नवीन ट्रॅक प्रेक्षकांना निश्चितपणे आवडेल. कूल बंडाना, कार्गो पॅन्ट्‌स, शर्ट आणि क्लीन शेव्ह लूकमध्ये मोहित वेगळा दिसत आहे.

मोहित मलिकने ‘मिली’ या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत डेब्यू केला. छोट्या पडद्यावर त्याने अनेक मालिका आणि रिअ‍ॅलिटी शोजमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. एका कलाकाराचं आयुष्य हे खूप आव्हानात्मक असतं. शारिरीक फिटनेससोबतच मानसिक फिटनेसही तितकीच महत्त्वाची असते असे मोहित मलिकने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते. 

टॅग्स :कुल्फी कुमार बाजेवालास्टार प्लस