Join us

मोनालिसा आणि सोन्या खेळणार दांडिया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 09:38 IST

सध्या सुरू असलेल्या नवरात्र महोत्सवात या दोन्ही अभिनेत्री वेदश्री आणि पिया या दोघींशी दांडियाची जुगलबंदी स्पर्धा करणार आहेत.

ठळक मुद्देदांडिया नृत्य शिकताना सोन्या आणि मला अगदी मजा आली

‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ या मालिकेतील आपल्या कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकलेल्या अभिनेत्री मोनालिसा आणि सोन्या या लवकरच दांडिया खेळणार आहेत. सध्या सुरू असलेल्या नवरात्र महोत्सवात या दोन्ही अभिनेत्री वेदश्री आणि पिया या दोघींशी दांडियाची जुगलबंदी स्पर्धा करणार आहेत.

मोनालिसा म्हणाली, “मला नवरात्राचा उत्सव आवडतो, विशेषत: त्यातील दांडिया आणि गरबा नृत्य करायला मला फार आवडतात. मी हे दोन्ही नृत्यप्रकार शिकलेले नाही. त्यामुळेच आमच्या मालिकेत मला गरबा आणि दांडिया नृत्य करावं लागणार असल्याचं मला समजताच मला खूप आनंद झाला. निर्मात्यांना हा प्रसंग जितका वास्तववादी करता येईल, तितका करायचा होता. तेव्हा सोन्या आणि मी आम्ही दोघींनी या नृत्याचं शास्त्रीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्हाला ही नृत्यं नैसर्गिकपणे करता आली असती. दांडिया नृत्य शिकताना सोन्या आणि मला अगदी मजा आली. आता आमचा हा प्रसंग मालिकेत कधी प्रसारित होतो, त्याची आम्ही वाट बघत आहोत.”

मोनालिसाबरोबर दांडिया करण्याच्या कल्पनेने खुश झालेल्या सोन्याने सांगितले, “मला मोनालिसाबरोबर नृत्य करायचं आहे, या गोष्टीवर प्रथम विश्वासच बसेना, कारण मोनालिसा ही उत्कृष्ट नर्तकी आहे. तिला नृत्यकलेची माहिती आहे. मी नृत्य करताना तिचं निरीक्षण करीत असते आणि तिच्याकडून काही शिकण्याचा प्रयत्न करीत असते. दांडियाचा सराव करीत असताना तिने मला काही पदन्यास शिकविले. मला तिच्याकडून खूप काही शिकता आलं. स्टंट प्रसंगांपासून दांडिया नृत्यापर्यंत, नजर मालिकेने मला माझ्यातील कौशल्ये आजमावून पाहण्याची संधी दिली आहे. आता हा दांडिया साकार करताना आम्हाला जशी मजा आली, तशीच तो पाहताना प्रेक्षकांना येईल, अशी अपेक्षा आहे.” प्रेक्षकांना लवकरच नवरात्रीचा एक भव्य भाग पाहायला मिळेल, ज्यात अनेक गुपिते उघड होताना दिसतील. 

टॅग्स :नजर