‘झाला बोभाटा’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री मोनालिसा बागल हिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आता ही अभिनेत्री लवकरच एका आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री स्मिता गोंदकरही झळकणार आहे. ‘१८ ओन्ली कायद्याचा घो’ असे या चित्रपटाचे नाव आहे. तिच्या या चित्रपटाविषयी मोनालिसा बागल सांगते की, या चित्रपटात मी मुख्य भूमिकेत असणार आहे. खूपच सुंदर असा हा चित्रपट आहे. या चित्रपटात मी एक साधी सरळ ग्रामीण भागातील मुलगी दाखविण्यात आली आहे. मात्र शिक्षणामुळे ती शहरात येते. शहरात आल्यावर तिच्यामध्ये खूपच बदल दाखविण्यात आला आहे. हा बदल होताना तिच्या आयुष्यात एक मुलगा येतो. टीनएजर असल्यामुळे या दोघांना लग्न करता येत नाही. तिच्या आयुष्यात येणाऱ्या मुलाचे वय १८ पूर्ण झालेले असते. पण कायद्याप्रमाणे २१ पाहिजे असते. अशावेळी एक विचार निर्माण होतो की, १८ पूर्ण असल्यामुळे तुम्ही मतदान करू शकता, देशाचा पंतप्रधान निवडून देऊ शकता, मग स्वत:साठी जोडीदार का नाही? अशा कथेवर भाष्य करणारा हा चित्रपट असणार आहे. तसेच अभिनेत्री स्मिता गोंदकर हिच्यासोबत काम करताना खूप छान अनुभव मिळाला. तसेच या चित्रपटातील दिग्दर्शक, कलाकार सर्वांकडून खूप काही शिकण्यास मिळाले असल्याचेही तिने यावेळी सांगितले.
मोनालिसा-स्मिता झळकणार एकत्र!
By admin | Published: February 15, 2017 2:55 AM