Join us  

प्रेम कमी कौटुंबिक ताणतणाव जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2016 7:45 PM

सनम तेरी कसम हे नाव वाचून हा चित्रपट प्रेमकथा असेल असा समज होतो परंतु दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ज्या मालिकांचा रतीब सुरू असतो त्यातील कौटुंबिक नात्यांसारखे यातून दर्शन घडते.

- अनुज अलंकार
 
चित्रपट परीक्षण : सनम तेरी कमस
रेटिंग 2.5 स्टार
 
सनम तेरी कसम हे नाव वाचून हा चित्रपट प्रेमकथा असेल असा समज होतो परंतु दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ज्या मालिकांचा रतीब सुरू असतो त्यातील कौटुंबिक नात्यांसारखे यातून दर्शन घडते. ब:याच वर्षापूर्वी सलमान खान आणि स्नेहा उलाल यांना घेऊन राधिका -विनय या जोडीने यशस्वी असा प्रेमपट बनविला होता. आता त्याच जोडीने सनम तेरी कमस आणला आहे.
चित्रपटाची कथा मुंबईतील दाक्षिणात्य कुटुंबाची आहे. त्यात सरस्वती (मारवा होकेन) आपले आईवडील आणि बहिणीसोबत राहात असते. साध्यासरळ पद्धतीने जगणारी सरस्वती ग्रंथालयात नोकरीला असते. परंतु अशा साध्यासरळ सरस्वतीला त्याचमुळे कोणी मुलगा पसंती देत नसतो. सरस्वतीचेच लग्न न झाल्यामुळे तिच्या बहिणीच्या लग्नातही अडथळे येतात. बहिणीच्या लग्नाच्या मुद्यावरून सरस्वती त्रस्त असते. आपल्या नोकरीच्या ठिकाणी सरस्वती अभिमन्यु (अनुराग शर्मा) या तरुणाला आकर्षित करते परंतु ती त्याला आपल्या भावना व्यक्त करून सांगू शकत नाही. सरस्वती राहात असते त्याच इमारतीत इंदर (हर्षवर्धन राणो) राहायला येतो. तो दिवसभर दारुच्या नशेत असतो व सुखोपभोगात दंग असतो. त्याच्यामुळे  इमारतीत राहणारे त्रसून जातात परंतु काहीच करू शकत नाहीत. सरस्वती अचानक इंदरच्या जवळ येते. हे वास्तव समजल्यावर तिचे आईवडील सरस्वतीला घरातून हाकलूनच लावतात असे नाही तर ती आपल्यासाठी मेली असे समजून तिचे श्रद्धही करून टाकतात. घरदार नसलेल्या सरस्वतीला इंदर आश्रय देतो त्यामुळे ते दोघे आणखीनच जवळ येतात. एक चांगला मित्र या नात्याने इंदर सरस्वती आणि अभिमन्यु यांना एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी प्रयत्न करतो परंतु अभिमन्यू शेवटच्या क्षणी सरस्वतीशी लग्न करायला नकार देतो. सरस्वती कोलमडून पडते व त्यावेळी इंदर तिचा आधार बनतो.
सरस्वतीला कॅन्सर असल्याचे व तिचे आयुष्य फारच थोडे असल्याचे अचानक समजते. सरस्वतीला आनंदी ठेवण्यासाठी इंदर तिच्याशी लग्न करायला तयार होतो. सरस्वतीच्या वडिलांनाही आपल्या चुकीची जाणीव होते. मग सरस्वती आनंदाच्या अशा शिखरावर जाऊन पोहोचते जेथे जायचे तिचे स्वप्न होते.
 
चित्रपटाचे दोष : राधिका-विनय यांनी प्रेमकथेच्या नावावर अशी काही कथा निवडली की तिला त्यांनीच गुंतागुंतीची बनवली. एकाच वेळी अनेक मार्ग खुले ठेवून काम करण्याच्या हट्टापायी चित्रपटाची उत्सुकता घालवून बसले. कथा सहजसोपी ठेवण्याऐवजी तिच्यात गुंतागुंत करून ठेवली. कथा कधी वास्तव तर कधी फिल्मी बनविण्याच्या प्रयत्नांत सगळा चित्रपट असंतुलीत होत जातो. इंदरच्या भूमिकेची सर्वात जास्त फरपट करण्यात आली. कधी त्याला सुपरमॅन बनविण्यात आले तर कधी गुंड, कधी दारुडा, कधी वडिलांवर नाराज असलेला बंडखोर मुलगा तर कधी सुखोपभोगी आणि कधी तर सरस्वतीचा प्रियकर. एवढय़ा सगळ्य़ा छटा दाखविताना इंदरची भूमिका विस्कळित झाली. प्रेमाचा त्रिकोण बनविण्याच्या प्रयत्नांत चित्रपटाचे नुकसान झाले. दुबळे पटकथा लेखन आणि दिग्दर्शन यामुळे चित्रपट बुडण्यास हातभार लागला.
चित्रपटाची वैशिष्टय़े : दूरचित्रवाणी वाहिनीवर दिसणारी पाकिस्तानी अभिनेत्री मारवा होकेन हिने सरस्वतीची भूमिका साकारण्यासाठी कष्ट केले. परंतु तिचा आवाज तिची कमकुवत बाजू ठरला तथापि तिचा अभिनय उत्तम आहे. पहिलाच हिंदी चित्रपट असूनही तिने चांगले कष्ट केले आहेत. इंदरची भूमिकाच दुबळी आहे परंतु हर्षवर्धन राणोने परिश्रम केले आहेत. दोघांची जोडी पडद्यावर जमते. चित्रपटाचे संगीत उत्तम असून रोमान्स आणि कौटुंबिक संघर्षाची काही दृश्ये प्रेक्षकांना भिडतात. ते भावनिकही होतात. सहायक भूमिकांत मनीष चौधरी (सरस्वतीचे वडील), दिव्यता, मुरली शर्मा, ऋषद राणा, सुदेश बैरी, अनुराम शर्मा, विजय राज यांनी आपापली जबाबदारी पार पाडली आहे. चित्रपटाची तांत्रिक अंगे चांगली आहेत.
 
चित्रपट का बघावा : मारवाचा अभिनय आणि संगीतासाठी
 
चित्रपट का बघू नये : कथेतील गुंतागुंत. त्यामुळे प्रेक्षक गोंधळून जातात.
एकूण काय तर सनम तेरी कसम प्रेमकथा कमी आणि कौटुंबिक तणाव जास्त. तरीही एकदा तो बघितला जाऊ शकतो.