Join us

आदर्श-आनंदी यांच्या आवाजात ‘मोरयाचा गजर’

By admin | Published: July 08, 2017 5:09 AM

मेघा घाडगे अभिनित ‘काटाकिर्रर्र’ हे गाणे आपल्या चांगल्याच परिचयाचे आहे. आदर्श शिंदे यांच्या आवाजातील या गाण्याने गेल्या काही

मेघा घाडगे अभिनित ‘काटाकिर्रर्र’ हे गाणे आपल्या चांगल्याच परिचयाचे आहे. आदर्श शिंदे यांच्या आवाजातील या गाण्याने गेल्या काही महिन्यांतच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अनेक मराठी सिनेमांमधून आपण आदर्श शिंदे यांच्या आवाजाची जादू अनुभवली आहे. ‘दुनियादारी’ या सिनेमातील ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’ गाणे असो किंवा ‘दगडी चाळ’ मधील ‘मोरया’ हे गाणे त्याच्या आवाजाने गाण्याला एक वेगळा साज येतो. काटाकिर्ररची हीच टीम आपल्यासाठी गणपतीची स्तुती सांगणारे एक गाणे घेऊन येत आहे. गणपती हा आपल्या सगळ्यांचा लाडका असून त्याच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. ‘मोरया-तुझ्या नामाचा गजर’ हे या गाण्याचे नाव असून नुकतेच या गाण्याचे रेकॉर्डिंग एन्झी स्टुडिओ येथे करण्यात आले. ‘आदी तू अनंत तू तू गणनायका, शिवसुता गिरिजात्मजा तू गणनायका’ असे या गाण्याचे बोल असून अमिताभ आर्य यांनी हे बोल लिहिले आहेत. आशिष मोरे यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे संगीत संयोजन गणेश सातार्डेकर यांनी केले आहे. गणपतीची स्तुती करणाऱ्या गाण्यात आदर्श शिंदे यांच्यासोबत आनंदी जोशी यांचादेखील आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. गणेशाची स्तुती करणारे आदर्श-आनंदीच्या स्वरातील हे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.