कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी (Aai Tulja Bhavani Serial) मालिकेत तुळजाभवानी भक्तांच्या श्रद्धेची आणि आत्मबळाची नवी परीक्षा घेताना दिसणार आहे. देवीच्या कृपेने भक्तांच्या जीवनातील संकटं दूर झाली, मार्गदर्शन मिळालं, चिंता मिटल्या, चिंतामणी दगड आला, आणि चिंतेचं ओझं हलकं झालं. मात्र, या स्थैर्याच्या आणि समृद्धीच्या प्रवासात भक्तांनी सतत सजग राहावं, ही शिकवण देण्यासाठी देवी एक अनोखी दैवी लीला साकारते. त्यानुसार गावात भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. भंडार्याच्या सोहळ्यात आता विघ्न येऊ लागतात. देवी त्यांची परीक्षा पाहते.
गावात एका भव्य भंडाऱ्याचं आयोजन होतं. देवीच्या कृपेने सगळीकडे समाधानाचं वातावरण असताना, अचानक या सोहळ्यात अडथळ्यांची मालिका सुरू होते. संकटं उभी राहतात, परीक्षा सुरू होते. भवानीशंकरासोबत गावकरी रूपात जाऊन देवी त्यांना जेरीस आणते. देवीच्या या अनोख्या लीलेचा आरंभ या आठवड्यात होणार असून त्याचा कळससाध्य येत्या रविवारच्या विशेष भागात घडणार आहे.
आई तुळजाभवानीची अनोखी लीलासगळ्या अडचणींवर मात करायला भक्तांनी सदैव जागरूक राहणं गरजेचं आहे. देवीच्या कृपेची ढाल असली तरी इच्छाशक्तीच्या बळावर प्रत्येक संकटावर मात करणं शक्य आहे, हा साक्षात्कार आई तुळजाभवानी आपल्या भक्तांना या अनोख्या लीलेच्या माध्यमातून करून देणार आहे. आई तुळजाभवानीची ही अनोखी लीला या आठवड्यात भक्तांना बघायला मिळणार असून या लीलेचा कळस, भक्तांच्या श्रद्धेचा अंतिम विजय येत्या रविवारी विशेष भागात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.