आई आणि मुलाचे नाते जगातील सगळ्यात अनमोल नाते आहे. आईच्या प्रेमाची परतफेड कुणीच करू शकत नाही. पण किमान तिच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाऊ शकते. आज मे महिन्याचा दुसरा रविवार म्हणजे, जागतिक मातृदिन. आईवर असलेले प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. आज याच खास दिवसाच्या निमित्ताने बॉलिवूडच्या काही ‘सिंगल मदर्स’बद्दल आपण जाणून घेणार आहोत. एकटीच्या बळावर आई आणि करिअर अशी दुहेरी भूमिका लिलया पार पाडणा-या या बॉलिवूडच्या या सिंगल मदर्स ख-या अर्थात ‘सुपर मॉम्स’ म्हणायला हव्यात. आज अशाच काही सुपर मॉम्सविषयी माहिती सांगणार आहोत.
चाळीशी कधीच ओलांडलेल्या सुश्मिता सेनने अद्यापही लग्न केलेले नाही. पण ती आई मात्र कधीच झालेय. वयाच्या उण्यापु-या २७ व्या वर्षी सुश्मिताने सिंगल मदर बनण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आणि पहिली मुलगी रेने हिला दत्तक घेतले. यानंतर दहा वर्षांनी म्हणजे २०१० मध्ये तिने दुसरी मुलगी अलिशा हिला दत्तक घेतले. रेने आणि अलिशा सुश्मिताच्या जीव की प्राण आहेत. ती एकटीच्या बळावर या दोघींचे संगोपन करतेय.
पूनम ढिल्लोन
माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री पूनम ढिल्लोन यांनी निर्माता अशोक ठकेरिया यांच्यासोबत लग्न केले होते. लग्नानंतर त्यांना मुलगी पालोमा आणि मुलगा अनमोल अशी दोन मुले झालीत. पण काही वर्षांनंतर पूनम पतीपासून विभक्त झाल्यात आणि मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.
नीना गुप्ता
वेस्टइंडिजचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत नीना गुप्ता यांचे अफेअर होते. याचदरम्यान लग्नापूर्वी नीना प्रेग्नंट राहिल्या. यानंतरही विवियन यांनी नीनांसोबत लग्न केले नाही. पुढे नीना यांनी एका मुलीला जन्म दिला आणि या मुलीची जबाबदारी स्वत: स्वीकारली. लग्न न करता आई बनलेल्या नीना यांनी मुलगी मसाबाला असे काही घडवले की, ती आज बॉलिवूडची टॉपमोस्ट फॅशन डिझाईनर आहे.
सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंग हिनेही आपल्या दोन्ही मुलांना म्हणजे, सारा व इब्राहिमला एकटीने लहानाचे मोठे केले. सैफपासून विभक्त झाल्यानंतर अमृताने कधीच मागे वळून पाहिले नाही. आपल्या दोन मुलांना घेऊन ती दुसºया घरात शिफ्ट झाली आणि एकटीच्या बळावर मुलांचे संगोपन केले.
करिश्मा कपूर
करिश्माने बिझनेसमॅन संजय कपूरशी लग्न केले. पण आपसी मतभेदांमुळे हे लग्न टिकू शकले नाही. आता करिश्मा कपूर आपल्या दोन मुलांसोबत एकटी राहते. एकटीने दोन मुलांचा सांभाळ करते.