मदर्स डेच्या निमित्ताने हिंदी सिनेसृष्टीतल्या कलाकारांनी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
शर्मन जोशी सध्या ऑल्ट बालाजीच्या बारीश या वेबसीरिजमध्ये काम करताना दिसतो आहे. त्याने मदर्स डेच्या निमित्ताने सांगितले की, आपल्याला शिकवले आहे की आई ही दैवत असून तिने आपल्याला कसे जगायचे शिकवले आहे. कोणतीही मर्यादा न ठेवता ती आपल्या मुलांवर प्रेम करत असते. तिचे व्यक्ती व त्याचे जीवन घडविण्यात मोलाचा वाटा असतो.
शंतनु माहेश्वरी म्हणतो, माझ्या आईचा माझा डान्सची रुची वाढविण्यात मोलाचा वाटा आहे. बालपणापासून तिने माझ्या आवडीबद्दल व मला डान्समध्ये प्रशिक्षण मिळावे म्हणून काळजी घेतली आहे. ती नेहमी मला व माझ्या निर्णयाला सपोर्ट करते. तसेच माझ्या कठीण काळात ती मला योग्य मार्ग दाखवते.
प्रिया बॅनर्जी लवकरच ऑल्ट बालाजीच्या बेकाबू या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. ती मदर्स डेच्या निमित्ताने म्हणाली की, मदर्स डे फक्त एक दिवस नाही तर दररोज साजरा केला पाहिजे. माझे माझ्या आईसोबत खूप चांगले नाते असून ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. ती ज्या पद्धतीने माझ्यावर प्रेम करते. त्याची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. बरेच वर्ष मी कुटुंबाशिवाय राहिले. आई कॅनडात असते. पण तिचे प्रत्येक इच्छा पूर्ण होवो आणि तिला स्पेशल वाटण्याचे प्रयत्न करणार आहे.
करण वाहीची नुकतीच हंगामा प्लेवर न्यू बॉर्न मदर ही शॉर्टफिल्म प्रदर्शित झाली. त्याने मदर्स डेच्या निमित्ताने सांगितले की, माझे पालक दिल्लीत राहतात. मला सर्व आईंचे आभार मानायचे आहेत. ते आमच्यासाठी खूप काही करतात. त्यांनी आम्हाला नवीन जीवन दिले.
हर्षिता गौरने सांगितले की, प्रत्येकाच्या जीवनात आईला खूप महत्त्व आहे. माझी आई माझी बेस्ट फ्रेंड आहे, मोठी चाहती, मेंटॉर आणि सगळे काही आहे. प्रत्येक मुलाने हा दिवस स्पेशल केला पाहिजे.