Join us

'मिर्झापूर २'वर भडकल्या मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल, 'या' कारणाने केली बॅनची मागणी

By अमित इंगोले | Published: October 26, 2020 4:31 PM

आता मिर्झापूर या वेबसीरीजवर मिर्झापूरच्या खासदार आणि अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांनीच या वेबसीरीजवर बंदीची मागणी केली आहे. 

नुकत्याच रिलीज झालेल्या लोकप्रिय मिर्झापूर वेबसीरीजच्या दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ही वेबसीरीज भारतात सर्वात जास्त बघितली जाणारी वेबसीरीज ठरली आहे. पण सुरूवातीला या वेबसीरीजवर बंदीची मागणी करण्यात आली होती. मात्र, तरी सुद्धा ही वेबसीरीज रिलीज करण्यात आली आहे. आता तर या वेबसीरीजवर मिर्झापूरच्या खासदार आणि अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांनीच या वेबसीरीजवर बंदीची मागणी केली आहे. 

अनुप्रिया पटेल यांचं मत आहे की, ज्याप्रकारे यात मिर्झापूरची इमेज दाखवण्यात आली आहे ती फार चुकीची आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीचे मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ आणि सूचना-प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना टॅग करत ट्विट केलं आहे आणि या वेबसीरीजवर बंदीची मागणी केली आहे.   

त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, माननिय योगी आदित्यनाथ जी यांच्या नेतृत्वात मिर्झापूरचा विकास होत आहे. हे एक समरसतेचं केंद्र आहे. मिर्झापूर नावाच्या वेबसीरीजच्या माध्यमातून हा एक हिंसक भाग असल्याचं दाखवत बदनामी केली जात आहे. या सीरीजच्या माध्यमातून जातीय गैरसमज पसरवले जात आहेत. मिर्झापूर जिल्ह्याची खासदार असल्या नात्याने माझी मागणी आहे की याची चौकशी व्हावी आणि या विरोधात कारवाई व्हायल पाहिजे'.

दरम्यान, 'मिर्झापूर' वेबसीरीजच्या कथेत पूर्वांचलचा एक बाहुबली डॉन अखंडानंद त्रिपाठीला मिर्झापूरचा असल्याचं दाखवलं आहे. सीरीजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदु शर्मा, श्वेता त्रिपाठी, ईशा तलवार, कुलभूषण खरबंदा आणि रसिका दुग्गल यांच्या मुख्य भूमिका आहेत. लोकांकडून या सीरीजला भरभरून प्रेम मिळत आहे. अशात आता ही वेबसीरीज बंद होणार की सुरूच राहणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. 

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजवेबसीरिजउत्तर प्रदेश