बॉलिवूड सेलिब्रिटींचे आवडते फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी (Sabysachi Mukherjee) सध्या चांगलेच वादात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना खास महिलांसाठी ‘इंटिमेट फाइन ज्वेलरी’ (Intimate Fine Jewellery) हे खास पारंपरिक दागिन्यांचं कलेक्शन लॉन्च केलं. मात्र, या कलेक्शनच्या जाहिरातीमुळे (Sabyasachi mangalsutra ad) मोठा वादंग निर्माण झाला आहे. अनेकांनी या जाहिरातीचा निषेध केला असून या नव्या कलेक्शनवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. यामध्येच आता भाजपाच्या एका मंत्र्यांनी ही जाहिरात न हटवल्यास कायदेशीर कारवाई करु असा इशारा दिला आहे.
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी जाहीरपणे सब्यसाचीवर टीकास्त्र डागलं आहे. सोबतच 'ही जाहिरात २४ तासांच्या आता हटवली नाही तर कायदेशीर कारवाई करु', असा थेट इशारा दिला आहे.
"सब्यसाची यांची मंगळसूत्राची जाहिरात अत्यंत आक्षेपार्ह आहे. त्याचा आमच्यासारख्या लोकांना त्रास होत आहे. त्यामुळे सब्यसाची यांनी ही आक्षेपार्ह जाहिरात २४ तासांत हटविली नाही. तर, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करु", असा इसारा मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिला आहे.
काय आहे सब्यसाची यांची जाहिरात?
काही दिवसांपूर्वी सब्यसाची यांनी 'इंटिमेट फाइन ज्वेलरी' हे नवीन दागिण्यांचं कलेक्शन लाँच केलं. यात काही स्त्री-पुरुषांचं बोल्ड फोटोशूट दाखवण्यात आलं आहे. यात काही मॉडल्सने बोल्ड कपडे परिधान करुन त्यावर मंगळसूत्र घातलं आहे. त्यामुळे केवळ एका मंगळसूत्राची जाहिरात करण्यासाठी इतक्या बोल्ड फोटोशूटची गरज काय होती? असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. सोबतच त्यांनी ट्रोल करण्यासही सुरुवात केली.
दरम्यान, भाजपचे कायदेशीर सल्लागार यांनीहीदेखील या जाहिरातीवर आक्षेप घेत सब्यसाची यांना नोटीस बजावली आहे. ''जाहिरातीमध्ये मॉडेल्स ही इंटीमेट स्थितीमध्ये आहे. तसेच या जाहिरातीतील माणूस देखील शर्टलेस आहे. त्यामुळे हे हिंदू विवाह आणि हिंदू संस्कृतीसाठी संतापजनक कृत्य आहे'', असे या नोटीशीमध्ये नमूद करण्यात आलं आहे.