Join us

मृणाल दुसानिस करतेय ह्या मालिकेतून कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 13:37 IST

अभिनेत्री मृणाल दुसानिसने 'अस्सं सासर सुरेख बाई' मालिका अर्ध्यात सोडून सिनेइंडस्ट्रीतून काही कालावधीसाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

ठळक मुद्देमृणाल दुसानिस 'हे मन बावरे' मालिकेतून करणार पुनरागमनमृणाल दुसानिस व शशांत केतकर पहिल्यांदाच एकत्र करणार काम

'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून अभिनेत्री मृणाल दुसानिस घराघरात पोहचलेली त्यानंतर तिने 'तू तिथे मी', 'अस्सं सासर सुरेख बाई' ह्या मालिकेत काम केले. 'अस्सं सासर सुरेख बाई' मालिका अर्ध्यात सोडून तिने सिनेइंडस्ट्रीतून काही कालावधीसाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील 'हे मन बावरे' मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ती कमबॅक करते हे समजल्यापासून तिचे चाहते खूप खूश झाले आहेत. ह्या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता शशांक केतकर मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. 

'हे मन बावरे' या मालिकेबाबत शशांक केतकरने सोशल मीडियावर चाहत्यांना मालिकेचा प्रोमो शेअर करून सांगितले आहे. त्याने लिहिले की, 'जुने मित्र, नवी कथा. नमस्कार मंडळी, बाप्पाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमाने नवी सुरूवात करतो आहे, मधुगंधा कुलकर्णी तुझ्या लेखणीतून व मंदार देवस्थळी तुझ्या दिग्दर्शनातून साकारलेले पात्र पुन्हा एकदा करायला मिळणे, हे मी खरेच माझे भाग्य समजतो. मृणाल दुसानिस व शर्मिष्ठा राऊत यांच्यासारख्या अनुभवी अभिनेत्रींबरोबर काम करायला मिळणे ही आणखीन एक जमेची बाजू आहे. कलर्स मराठीने मला ही अप्रतिम संधी दिली, त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. नवीन अपडेट देत राहिन. ९ ऑक्टोबरपासून हे मन बावरे बघायला विसरू नका. '

'हे मन बावरे' या मालिकेच्या निमित्ताने  शशांक व मृणाल पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. मधुगंधा कुलकर्णी, शशांक केतकर व मंदार देवस्थळी यांनी याआधी होणार सून मी ह्या घरची या मालिकेसाठी एकत्र काम केले होते. ही मालिका प्रेक्षकांना खूप भावली होती आणि या मालिकेतून शशांश केतकर श्रीच्या भूमिकेतून लोकप्रिय झाला होता. हे मन बावरे मालिकेत प्रेमकथा पाहायला मिळणार असून शशांक व मृणाल यांची केमिस्ट्री छोट्या पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.  

टॅग्स :मृणाल दुसानीसशशांक केतकरकलर्स मराठी