Join us

मृणाल दुसानिसला आवडत नाही नवऱ्याची ही सवय, म्हणाली - "तो खूप..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 18:33 IST

अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) सिनेविश्वात सक्रीय नसली तरी ती सोशल मीडियावर बऱ्याचदा तिचे आणि कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते. नुकतीच बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर भारतात परतली आहे.

अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) सिनेविश्वात सक्रीय नसली तरी ती सोशल मीडियावर बऱ्याचदा तिचे आणि कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते. नुकतीच बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर भारतात परतली आहे. दरम्यान आता मृणालने अलिकडेच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने तिच्या पतीबद्दल सांगितले आहे.

अभिनेत्री मृणाल दुसानिसने नुकतेच दिलेल्या मुलाखतीत तिच्या पतीच्या न आवडणाऱ्या सवयीबद्दल सांगितले. तिने अभिनेत्री सुलेखा तळवलकरच्या दिल के करीबला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सांगितले की, त्याच्यामधली जी गोष्ट मला आवडली ती म्हणजे तो खूप मोकळीक देतो. स्पेस देतो आणि माझ्या मतांचा आदर करतो. सन्मान करतो. ही जी गोष्ट आहे आमच्या दोघांमध्ये आम्हाला महत्वाची वाटते. 

त्याचे हे वागणे थोडेसे खटकते. पण...ती पुढे म्हणाली की, तसेतर त्याच्यात वाईट म्हणण्यासारखे काहीच नाही. पण हे आहे की तो खूप काळजी घेतो. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की हे मला जमेल. मी हे करू शकते. मी एकटी मुंबईत राहिली आहे. मी १०- १२ वर्ष मुंबईत राहिलीये. मी एकटी फिरलीये. मी इथून इथे एकटी जाऊ शकते. हे मी एकटीने करू शकते. मग हे जे त्याचे आहे की तो खूप काळजी घेतो आणि ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतो, मग मला कधी कधी वाटते की हे माझे वडील पण हेच करत होते तर तू थोडासा थांब. म्हणजे काळजीपोटी तो बऱ्याच गोष्टी करतो. पण मला त्याचे हे वागणे थोडेसे खटकते. पण मला त्याचे आश्चर्यही वाटते की तो खूप शांत आहे. 

त्याचे मला खूप कौतुक वाटते

प्रत्येक गोष्टीवर तो शांतपणे आणि विचार करून उत्तर देतो. मी तशी नाहीये. मला पटकन राग येतो. मात्र त्याचे तसे नाही. मी त्याला चिडताना सहसा नाहीच पाहिले. तो खूप पेशन्स असलेला व्यक्ती आहे. त्याचे मला खूप कौतुक वाटते, असे मृणाल म्हणाली.  

टॅग्स :मृणाल दुसानीस