Join us

मृणाल ठाकूर झळकली बादशाहच्या 'बॅड बॉय x बॅड गर्ल' गाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 19:41 IST

पहिल्यांदाच बादशहाने मृणाल ठाकूरसोबत काम केले असून त्यांची या गाण्यासाठी झकास केमिस्ट्री जमून आली.

मागील दशकभरापासून ग्लोबल पॉप-स्टार बादशाह हा त्याच्या सर्वाधिक पसंत करण्यात येणाऱ्या पार्टी ट्रॅकसाठी ओळखला जातो. नुकतेच त्याचे नवीन सिंगल ‘बॅड बॉय x बॅड गर्ल’ प्रदर्शित झाले; ज्यामध्ये निखिता गांधी आणि फरहान अख्तर अभिनित ‘तुफान’मध्ये झळकलेली मृणाल ठाकूर दिसणार आहे.

या रॅपरचे मागील काही सिंगल ‘गेंदा फूल’ म्युझिक चार्टमध्ये वरच्या क्रमांकावर असून त्यांना ८५० दशलक्षहून अधिक व्ह्यूव्ज मिळाले, आजही ते प्रेक्षकांच्या पसंतीचे आहे. बादशहाचा सिग्नेचर स्वॅग आणि त्याला साजेसे शब्द, सोबत निखिताचा दिलखेच आवाज, मृणालला नवीन लूक आणि थिरकायला लावणारे संगीत यामुळे ‘बॅड बॉय x बॅड गर्ल’ हे एक धमाल क्लब जॅम आणि पार्टी स्टार्टर ठरले. या म्युझिक व्हिडियो स्टाईलबाज इंडस्ट्रीयल सेट-अपमध्ये चित्रित करण्यात आला असून त्याला यापूर्वी कधीही पाहिले नसतील अशास्वरुपाच्या ऑटोमोबाईल वैशिष्ट्यांची साथ लाभली आहे.

सोनी म्युझिकवर ‘बॅड बॉय x बॅड गर्ल’ प्रसिद्ध झाले असून त्याला बादशहाच्या अविस्मरणीय रॅपचा धमाल तडका आहे. पहिल्यांदाच बादशहाने मृणाल ठाकूरसोबत काम केले असून त्यांची या गाण्यासाठी झकास केमिस्ट्री जमून आली.

याबद्दल बादशहा म्हणाला की, “बॅड बॉय x बॅड गर्ल’ हे नाचायला भाग पाडणारे, खेळकर गाणे असून ती मस्तीत रंगलेली, मर्यादा ओलांडायला लावणारी धमाल आहे. आपल्यापैकी प्रत्येकात फारसा स्पर्श न झालेली आक्रमक बाजू असते आणि कधीतरी स्वत:ला कोशातून बाहेर काढून, चिंता विसरून त्या क्षणाची मजा घेण्यात खरा आनंद असतो. या गाण्याला निखिताच्या आवाजाचा परिसस्पर्श झाला. मृणालसोबत म्युझिक व्हिडियो शूट करणे धमाल ठरले. ती खूप छान दिसते. प्रेक्षक #BeBad साठी सज्ज आहेत ही आशा बाळगतो. आम्हाला बॅड बॉय x बॅड गर्ल’ची निर्मिती करताना जितकी मजा आली, शब्दांची आणि लयबद्ध गाण्याची तितकीच मजा प्रेक्षकही घेतील.”

या गाण्याकरिता बादशहासोबत काम करण्याचा अनुभव सांगताना मृणाल ठाकूर म्हणाली की, “जेव्हा बादशहाने मला बॅड बॉय x बॅड गर्ल’ ऐकायला सांगितले, तेव्हा आपल्याला त्यात काम करायचे आहे, हे मनात पक्के झाले. हे गाणे फार ‘कॅची’ आणि वेगळे आहे. मी यापूर्वी असा प्रयत्न केलेला नाही. या गाण्यातील माझा लूक आणि कामगिरी प्रेक्षकांना थक्क करेल आणि त्यांना तो आवडेल ही आशा करते. बादशहासोबत शुटचा आनंद निराळा होता. मी माझ्या पहिल्या म्युझिक व्हिडीओकरिता फार उत्सुक आहे. माझ्यावर प्रेम करत रहा.”

टॅग्स :मृणाल ठाकूरबादशहा