Join us

लग्नानंतर परदेशात स्थायिक झालेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री भारतात परतली! म्हणते, "४ वर्षांनी पुन्हा.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 18:33 IST

लग्न करुन परदेशात स्थायिक झालेली मराठी अभिनेत्री ४ वर्षांनी पुन्हा भारतात. चाहत्यांना खुप आनंद

अनेक अभिनेत्री लग्न करुन संसारात रमतात. काही अभिनेत्री अभिनय क्षेत्राला कायमचा रामराम ठोकतात तर काही मनोरंजन विश्वात दमदार कमबॅक करतात. काही अभिनेत्री तर लग्न करुन थेट परदेशात स्थायिक होतात. अशीच एक मराठी अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानिस. मृणाल आता तब्बल ४ वर्षांनी भारतात परतली आहे. मृणालने सहकुटुंब सेल्फी पोस्ट करत ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली आहे.

मृणालने तिचा नवरा नीरज आणि लेक नुरवीसोबतचा फोटो पोस्ट केलाय. मृणालने मायदेशी परतल्यावर नाशिकच्या गोदावरी किनारी भेट दिली. गोदाकाठचे फोटो पोस्ट करुन मृणाल लिहीते, "४ वर्षांनी अखेर मी भारतात परतले. मी माझ्या गावी पुन्हा परत आल्याने मला खुप आनंद झालाय. माझं नाशिक. गोदाकाठ" असं कॅप्शन मृणालने दिलंय. मृणाल भारतात परतल्याने तिच्या फॅन्सला आनंद झालाय. 

मृणालने 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' मालिकेतून अभिनय क्षेत्रात कमबॅक केलं होतं. याशिवाय 'तू तिथे मी', 'अस्स सासर सुरेख बाई' सारख्या मालिकांमधून तिने मराठी टीव्ही इंडस्ट्रीत लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळख मिळवली. मृणाल भारतात परतताच तिने नव्या मालिकेत किंवा सिनेमात झळकावं अशी तिच्या चाहत्यांना आशा आहे. यामुळे येत्या काही दिवसांत मृणाल कोणत्या नवीन प्रोजेक्टमध्ये दिसली तर आश्चर्य वाटायला नको.

टॅग्स :मृणाल दुसानीसमराठी